पुणे: आरोग्य भरती (arogya bharti) पेपर फुटीप्रकरणात बीड तसेच अमरावती जिल्ह्यातून एजंट आणि मुख्य आरोपी निशीद गायकवाड यांच्या साथीदाराला अटक केली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
गोपीचंद रामकृष्ण सानप (वय २८, वडझरी, ता. पाटोदा, बिड) व नितीन सुधाकर जेऊरकर (वय ४६, रा. (अमरावती) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
गोपीचंद सानप हा आरोग्य सेवक असून, तो वर्धा जिल्ह्यात नोकरी करत आहे. त्याने एजंट म्हणून काम केले आहे. तर, त्याने मुले जमविली असून आरोपींना ती मुले जमवून दिली आहेत. त्याने किती मुले जमविले व पैसे घेतले याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. त्याला शुक्रवारी दुपारी पकडण्यात आले आहे.
त्याच्याकडे तपास केला जात आहे. तर, नितीन जेऊरकर हा मुख्य जाणार आहे. आरोपी निशीद याचा साथीदार असून, त्याने पेपर फोडण्यात मदत केली आहे. परंतु, तो पोलीसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नंतर त्यांच्याकडे सखोल तपास केला जाणार आहे.
नेमकी किती मुले सानप याने पुरविली. तसेच त्यांच्याकडून पैसे घेतले हे त्यानंतर स्पष्ट होणार आहे.
एजंटचे धाबे दणाणले
पुणे पोलीसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून आरोग्य विभागाच्या भरती पेपर फुटीप्रकरणाचा तपास सुरू आहे. मुख्य आरोपी निशीद गायकवाड एजट आणि काही इतर शासकीय नोकरदारांना याप्रकरणी अटक केलेली आहे. सायबर पोलीसांनी जवपळपास याप्रकरणात १८ जणांना अटक केलेली आहे. म्हाडा तसेच टीईटीसोबतच पुणे पोलीसांकडून आरोग्य भरती प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे एजंटचे धाबे दणाणले आहेत. तर, म्हाडात देखील येत्या दोन दिवसात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.