शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

साडेसोळा हजार क्युसेक्सचा विसर्ग

By admin | Published: July 31, 2014 2:17 AM

शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने मुठा नदीत मंगळवारी मध्य रात्रीपासून मोठ्या प्रमाणात धरणातील पाणी सोडण्यात आले होते.

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने मुठा नदीत मंगळवारी मध्य रात्रीपासून मोठ्या प्रमाणात धरणातील पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे आज पहाटेपासून नदीकाठच्या परिसरात पूरजन्यस्थिती निर्माण झाली होती. धरणातून मध्यरात्री 3 नंतर तब्बल १६ हजार ५४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे सकाळी पाचच्या सुमारास बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला, तर नदीपात्रातील दोन्ही बाजूंचे रस्ते पाण्याखाली गेले होते. नदीपात्रात पाणी घुसल्यानंतर, या परिसरात रात्रीपासूनच पार्किंग करण्यात आलेली दहा चारचाकी वाहने अडकली होती. आज दुपार पर्यंत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही सर्व वाहने पात्रातून बाहेर काढली. दरम्यान, आज दुपारी तीननंतर हा विसर्ग १६५५ क्युसेक्स करण्यात आला. त्यामुळे नदीला आलेले पाणी ओसरून नदीपात्रातील रस्ता आणि भिडे पूल वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात गेल्या चोवीस तासांपासून मुसळाधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे या प्रकल्पातील खडकवासला धरण मंगळवारी तीनच्या सुमारास १०० टक्के भरले होते. त्यामुळे धरणातून रात्री आठनंतर नदीत पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार, रात्री आठनंतर मुठा नदीत सुमारे २५६८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यानंतरही धरणात पाऊस सुरूच असल्याने, तसेच पाणीसाठा वाढत असल्याने हा विसर्ग रात्री अकरा वाजता ५ हजार १३६ क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर रात्री तीन वाजता हा विसर्ग १६ हजार ८४१ क्युसेक्सने वाढविण्यात आला. हे सोडण्यात आलेले पाणी पहाटेपर्यंत शहरातील नदीपात्रात पोहोचल्याने पहाटे पाचच्या सुमारास डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता. तसेच, नदीपात्रातील रस्ताही पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने, हा पूल मंगळवारी रात्रीच बंद करण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. तसेच, नदीपात्रातील रस्ता वगळता शहरात नदीकाठी असलेल्या भागात कोठेही पाणी घुसण्याच्या घटना घडल्या नसल्याची माहिती महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांनी दिली. (प्रतिनिधी)