पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दिवाळीसाठी जादा बस सोडण्यात येणार असून, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बसच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण करता येणार आहे. काही विशेष बस फेºया शिवाजी नगर येथील कृषी महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सोडण्यात येणार असल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात आले. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात जाणाºया बस येत्या १४ ते १८ आॅक्टोबर दरम्यान शासकीय इंजिनिअरींग कॉलेज मैदानाजवळून सुटतील. तसेच १५ ते १८ आॅक्टोबर दरम्यान नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात जाणाºया जादा बस शिवाजी नगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथून सुटणार आहेत. या बसच्या फेºयांसाठी आगाऊ आरक्षण करता येणार आहे. याच बरोबर शिवाजी नगर एसटी स्थानकावरुन नियमित धावणाºया बस सुटतील. शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मैदानाजवळून नागपूर अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबेजोगाई, बीड, औसा, सिल्लोड, चोपडा, धुळे, हिंगोली, जाफराबाद, जालना, कळंब, मलकापूर, लातूर, मेहकर, जामनेर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, परतूर, पुसद, शेगांव, तुळजापूर, उदगीर, उमरगा, वाशीम, यावल, यवतमाळ आणि बुलडाणासाठी १४ ते १८ आॅक्टोबर दरम्यान बस सुटतील. पिंपरी-चिचंवड बस स्थानकावरुन सुटणाºया बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, यावलसाठी येथून जादा बस सोडण्यात येतील. स्वारगेट येथून सुटणाºया बस व्यतिरिक्त कोल्हापूर, पंढरपूर व सोलापूरला जादा बस सुटतील. महात्माफुले कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालयातून १५ ते १८ आॅक्टोबर या कालावधीत नाशिक विभाग व औरंगाबाद विभागात वेगवेगळ््या ठिकाणी जाणाºया जादा बसेस सोडण्यात येतील. ज्या प्रवाशांच्या तिकिटावर ‘एजीआरडी’ व ‘एक्स्ट्रा बस’ असा उल्लेख असलेल्या बस महात्माफुले कृषी विद्यापीठ येथून सुटतील. बससाठी तिकीट आरक्षणाची सोय असून, एसटीचे अधिकृत तिकिट विक्री केंद्र, बस स्थानके अथवा एसटीच्या संकेतस्थळावरुन, तसेच मोबाईल अॅपवरुन देखील तिकीट आरक्षण करता येईल, अशी माहिती एसटीचे पुणे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.
दिवाळीसाठी तिकीट आरक्षणाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 3:29 PM
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दिवाळीसाठी जादा बस सोडण्यात येणार असून, काही विशेष बस फेºया शिवाजी नगर येथील कृषी महाविद्यालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सोडण्यात येणार असल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात आले.
ठळक मुद्देया बसच्या फेºयांसाठी आगाऊ आरक्षण करता येणार आहे. पिंपरी-चिचंवड बस स्थानकावरुन सुटणाºया बसेस व्यतिरिक्त कोल्हापूर, चिपळूण, यावलसाठी येथून जादा बस सोडण्यात येतील.एसटीचे अधिकृत तिकिट विक्री केंद्र, बस स्थानके अथवा एसटीच्या संकेतस्थळावरुन, तसेच मोबाईल अॅपवरुन देखील तिकीट आरक्षण करता येईल.