शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

पुणे महापालिकेच्या हद्दीतील मोबाईल टॉवरची थकबाकी पोहचली १२५० कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 12:07 PM

पालिकेच्या हद्दीत जवळपास २० कंपन्यांचे एकूण २ हजार ३९८ मोबाईल टॉवर आहेत.

ठळक मुद्देअनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ : अनधिकृत टॉवर शोधून कराच्या कक्षेत 

पुणे : पालिकेच्या हद्दीतील मोबाईल टॉवर्सची थकबाकी सुमारे १ हजार २५२ कोटी रुपयांपर्यंत गेली असून, वारंवार प्रयत्न करूनही ही थकबाकी या मोबाईल कंपन्यांकडून वसूल करण्यात अपयश आले आहे. त्यातच महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने अनधिकृत मोबाईल टॉवर शोधून त्यांना कराच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आतपर्यंत असे आणखी २५० टॉवर आढळून आले आहेत. 

पालिकेच्या हद्दीत जवळपास २० कंपन्यांचे एकूण २ हजार ३९८ मोबाईल टॉवर आहेत. यातील काही मोबाईल कंपन्यांकडून ३५९ कोटी ६३ लाख रुपायांचे उत्पन्न मिळाले आहे. तर, ५१८ कोटी ४० लाख रुपयांचा कर थकीत आहे. यावर पालिकेने ७३४ कोटी रुपयांची शास्ती लावलेली आहे. कोरोनामुळे पालिका आर्थिक अडचणीत आहे. त्यातही मिळकत कर विभागाने केलेल्या कामगिरीमुळे चांगले उत्पन्न मिळाले. यासोबतच अभय योजनेचा लाभ पालिकेला झाला. जर वर्षानुवर्षे थकलेली मोबाईल टॉवरची थकबाकी वसूल झाली तर आर्थिक अडचणीत असणार्‍या पालिकेला हक्काचा महसूल मिळू शकतो.  

एकीकडे नागरिकांना कॉल ड्रॉप्स, नेटवर्क नसणे आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे या कंपन्या पालिकेचेही पैसे थकवीत आहेत. पालिकेच्या विरुद्ध काही मोबाईल कंपन्या न्यायालयात गेलेल्या आहेत. परंतु, उर्वरित मोबाईल कंपन्यांच्या थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. पालिका मोबाईल टॉवरवर मेहरबानी दाखवीत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.-------नागरिकांकडून जेव्हा त्यांच्या इमारतीमध्ये अथवा घराच्या छतावर मोबाईल टॉवर उभारायचे असतात अशा वेळी पालिकेची परवानगी घेतली जात नाही. शहरात आजमितीस असलेल्या टॉवरपैकी बहुतांश टॉवर बेकायदा आणि अनधिकृत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. नागरिकांनी त्यांच्या आणि मोबाईल कंपन्यांमध्ये झालेल्या करारनाम्याची माहिती पालिकेला देणे आवश्यक आहे. परंतु ही माहिती दिली जात नाही. या करारनाम्यांची माहिती मुद्रांक शुल्क विभागाकडून मागविण्यात आले होती. परंतु, तेथूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.-----------मोबाईल कंपन्यांकडे असलेली थकबाकीएकूण कंपन्या   २०एकूण टॉवर      २,३९८कर संकलन      ३५९.६३ कोटीथकीत कर        ५१८.४० कोटीशास्तीची रक्कम  ७३४ कोटी----------- 

  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMobileमोबाइल