शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

सुरक्षारक्षकाचा खून करणा-यास अटक, लहान मुलाच्या फोटोवरून मारेक-याची पटली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 3:51 AM

भंगार चोरी करण्यामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकाचा खून करणाºया एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे़

पुणे : भंगार चोरी करण्यामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकाचा खून करणाºया एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे़शकील बाबू तांबोळी (वय ३५, रा़ गोकूळनगर, धानोरी, विश्रांतवाडी, पूर्वी शिवापूरवाडा, कोंढणपूर फाटा) असे त्याचे नाव आहे़ शकील तांबोळी हा पूर्वी रतन मोटर्स येथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता़ त्याला तेथून काढून टाकण्यात आले होते़कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळील गुजरवाडी फाटा येथील रतन मोटर्स या शोरूममधील सुरक्षारक्षक आरिफ कासमखान पठाण (वय ५५, रा गुजरवाडी) यांच्या चेहरा आणि गळ्यावर वार करून खून केल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. तेथून जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये संशयितांची छायाचित्रे कैद झाली होती़ त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल पवार व कुंदन शिंदे यांनी विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास करून एका लहान मुलाचे छायाचित्र संपूर्ण कात्रज परिसरात फिरून लोकांना दाखविले़ या मुलाची ओळख पटविल्यानंतर त्यातून शकील तांबोळी यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले़शकील तांबोळी व त्याचे वडील या रतन मोटर्स येथे पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते़ गुन्हा केल्यानंतर तीन दिवस आरोपी सतत ठिकाणे बदलत होता़ हवालदार चंद्रकांत फडतरे यांना आरोपी धानोरी भागात असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सकाळी त्याला पकडले़घटनेच्या दिवशी सायंकाळी आरिफ पठाण यांचे बरोबर तांबोळीचा वाद झाला होता़ त्यानंतर त्याने एका अल्पवयीन मुलाच्या साथीने भंगार चोरीत अडथळा होऊ नये, म्हणून पठाण यांचा खून केल्याची कबुली दिली़ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, शिवदास गायकवाड, कर्मचारी चंद्रकांत फडतरे, कृष्णा निढाळकर, सचिन ढवळे, अमोल पवार, कुंदन शिंदे, प्रणव संकपाळ, उज्ज्वल मोकाशी, सरफराज देशमुख, अभिजित रत्नपारखी, महेश मंडलिक, गणेश चिंचकर, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडेकर, विनोद भंडलकर, पोलीस मित्र योगेश बळी यांनी केली आहे़७२ तासांत गुन्हेगार ताब्यात४कात्रज येथील रतन मोटर्समध्ये पठाण यांचा खून झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर, भारती विद्यापीठ पोलिसांनी अविरत परिश्रम करून सर्व तांत्रिक कौशल्याचा वापर करून ७२ तासांत गुन्हेगाराला पकडण्यात यश मिळविले़ रात्रीच्या अंधारात सीसीटीव्हीमध्ये अतिशय लांबून आणि अस्पष्ट दिसणाºया छायाचित्राचा आधार घेऊन आरोपीबरोबरच्या अल्पवयीन मुलांची ओळख पटविण्यासाठी त्यांनी संपूर्ण कात्रज परिसर पिंजून काढला़ त्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर ४ पथके तयार केली़ तांत्रिक माहितीद्वारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला शहराच्या दुसºया टोकावरील धानोरी येथून पकडण्यात यश मिळविले़

टॅग्स :Crimeगुन्हा