पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी श्रीकांत उर्फ डामच्या लक्ष्मण पडळघरे (वय २२, रा. पडळघरे वाडी, रिहे, ता. मुळशी ) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये मोक्का सारख्या गंभीर गुन्ह्यामधील आरोपी पकडणेकामी पुणे ग्रामीण दहशतवा विरोधी कक्ष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह गस्त करीत होते. या वेळी दहशतवाद विरोधी कक्षाचे अब्दुल शेख यांना पौड पोलीस ठाण्याच्या मोक्काच्या गुन्ह्यातील गेल्या एक वर्षापासून फरारी असलेला आरोपी रिहे परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून श्रीकांत उर्फ डामच्या लक्ष्मण पडळघरे याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पौड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार, विश्वास खरात, हवालदार अब्दुल शेख, विशाल भोरडे, किरण कुसाळकर, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत, अरुण पवार या पथकाने केली.