पुणे : यु ट्युबवर व्हिडिओ पाहून गाड्या चोरणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनीअटक केली़. त्याच्याकडून ३ दुचाकी आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत़. आकाश मोतीलाल कोटवाल (वय २०, सध्या रा. खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. चारणेरवाडी, ता. सिल्लोड, जि.औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोटवालविरूद्ध बीड आणि औरंगाबाद येथे वाहनचोरी व दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. त्यावेळी आठवड्यापूर्वी कात्रज भागातून दुचाकी चोरणारा एक चोरटा गुजरवाडी फाटा येथे थांबल्याची माहिती पोलीस नाईक उज्वल मोकाशी आणि शिवा गायकवाड यांना मिळाली. पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडले़. चौकशीत त्याने भारती विद्यापीठ परिसरातून २ आणि शिक्रापूर, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे वाहन चोरीचे ४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ३ दुचाकी आणि दोन लॅपटॉप असा १ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़. कोटवाल दुचाकी दुरुस्तीचे काम करायचा. काही दिवसांपूर्वी त्याने यूट्यूबवर वाहनचोरीचा व्हिडिओ पाहिला होता़. ते पाहून त्याने शहर परिसरातून दुचाकी लांबविल्याची कबुली पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, सहाय्यक आयुक्त रवींद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे, उपनिरीक्षक शिवदास गायकवाड, प्रदीप गुरव, विनोद भंडलकर, श्रीधर पाटील, गणेश सुतार, प्रणव सकपाळ, उज्वल मोकाशी, शिवा गायकवाड, समीर बागसिराज, दत्तात्रय पवार, सुमित मोघे, जगदीश खेडकर आदींनी केली. यापूर्वी अशाच प्रकारचा यु ट्युबवर व्हिडिओ पाहून कोल्हापूर येथून ४ आलिशान मोटारी चोरणाºयाला पुणे पोलिसांनी पकडले होते़.
युट्युबवर व्हिडिओ पाहून गाड्या चोरणाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 3:07 PM
यु ट्युबवर व्हिडिओ पाहून गाड्या चोरणाऱ्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली़.
ठळक मुद्देबीड आणि औरंगाबाद येथे वाहनचोरी व दरोड्याचा प्रयत्न ३ दुचाकी आणि दोन लॅपटॉप असा १ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त