महेश भानुदास गायकवाड असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशोत्सवाच्या सणामुळे अवैध शस्त्रास्त्र बाळगण्यास बंदी असतानाही महेश गायकवाड हे पिस्तूल बाळगून फिरत होते. त्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिसांचे एक पथक पाठविले व त्याला अटक केली. त्याच्याकडूल जिवंत काडतूस आणि गावठी बनावटीचे पिस्टल असा ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा. फौजदार पंदारे, पोहवा जनार्दन शेळके, पो. हवा. अजित भुजबळ, पो. हवा. राजू मोमीन पो. ना. मंगेश थिगळे, पो. ना चंद्रकांत जाधव, चालक पोकॉ अक्षय जावळे यांनी केली.
190921\0838img-20210919-wa0099.jpg
अवैध रित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करताना शाखेचे अधिकारी अशोक शेळके व पोलिस