मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील वक्तव्य करणाऱ्या आरोपीला पालघर येथून अटक करण्यात आली आहे. जयेश पडवळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील कमेंट आणि शिवीगाळ करणाऱ्या जयेश पडवळे, निशांत नाईक, संतोष एकनाथ चाकणकर, सुनील खळदकर, शैलेश भांबीड, अक्षय पांडे, ज्ञानेश्वर झोळेकर, अनिल सूर्यवंशी, पुष्पेंद्र बने या ९ जणांविरुद्ध जून महिन्यामध्ये मुंबईतील बांद्रा येथील खेरवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. पडवळेला अटक करण्यात आली आहे.