शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Manorama Khedkar: शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटक; मनोरमा खेडकरांना ३ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 4:06 PM

शेतकऱ्यांना धमकावण्याबरोबरच मनोरमा खेडकर यांचे पोलिसांची हुज्जत घालतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत

पुणे : आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात खेडकर कुटुंबाचे एकेक कारनामे उघड होऊ लागले होते. या प्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आता कोर्टात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. त्यांना कोर्टाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  

मनोरमा यांच्याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ऑडी कारची नोटीस देण्यासाठी घरी गेलेल्या पोलिसांनाही मनोरमा यांनी वाद घालत दमदाटी केली होती. तर बाणेर येथील बंगल्याबाहेर मेट्रोच्या कामात मनोरमा खेडकरांनी अडथळा आणल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यातही त्या पोलिसांशी अरेरावी करताना दिसून आल्या आहेत. पूजा खेडकर यांनी मनमानीकरत आपल्या ऑडी कारला अंबर दिवा लावला. तसेच गादीवर शासनाची पाटी लावली. याप्रकरणी पोलीस पूजा खेडकर यांच्या घरी ऑडी कारची तपासणी करण्याकरिता गेले होते. त्यावेळी त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांची हुज्जत घातली. तुम्हाला आतमध्ये घालेन अशी धमकी देत दमदाटी केली. या प्रकरणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर मनोरमा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आला. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकवण्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. मुळशी तालुक्यात मनोरमा यांनी जमीन खरेदी केल्यानंतर जेवढी जमीन घेतलियेब त्यापेक्षा जास्त जमिनीवर ते दावा करू लागले. या प्रकरणात शेतकऱ्यांनी मध्यस्थी केली असता मनोरमा यांनी बंदुकीच्या धाकाने त्यांना धमकावले. तर २ वर्षांपूर्वी  मेट्रोच्या कामात मनोरमा खेडकरांनी अडथळा आणल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यातही त्या पोलिसांशी अरेरावी करताना दिसून आल्या आहेत. पुण्यातील बाणेर रस्त्यावर ओम दीप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोर गेल्या काही काळापासून मेट्रोच काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी खेडकर यांच्या बंगल्यासमोरील फुटपाथवर ठेवले होते. त्यावरून मनोरमा खेडकर यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना याची माहिती चतुःश्रृंगी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तिथे पोहचले. मात्र मनोरमा खेडकर यांनी त्यांच्याशी देखील वाद घातला.

तीन प्रकरणे मनोरमा यांना भोवली 

पूजा खेडकर यांना मुजोरीपणामुळे अनेक गोष्टींना उत्तर द्यावे लागले. त्यांची पुण्यातून वाशीमला बदली केली गेली. शिवाय मसुरीतून त्यांना प्रशिक्षण थांबवण्याची सूचना आली. हे सर्व घडत असताना मनोरमा यांचे एक एक कारनामे समोर येत होते. आपल्या मुलीची सरकारी चौकशी सुरु असताना मनोरमा अरेरावी करताना दिसून आल्या. अखेर एका मागोमाग मनोरमा यांचे तीन कारनामे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले. त्यांनंतर मनोरमा खेडकर या पसार झाल्या होत्या. पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांची शोधमोहीम सुरु केली. अखेर महाड मधून त्यांना अटक करण्यात आली. मनोरमा यांना तिन्ही व्हिडिओची प्रकरणे चांगलीच भोवली असल्याचे दिसून आले आहे. कोर्टात पोलिसांनी त्यांना ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयias pooja khedkarपूजा खेडकरArrestअटक