पुणे : वसाहतीत दहशत माजविण्यासाठी आणि मित्राच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तलवार जवळ बाळगणा-याला तरूणाला युनिट १ गुन्हे शाखेने जेरबंद केले. अरबाज आमीर खान (वय २२ रा. लोहियानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दि. २३ मार्च रोजी मित्राच्या वाढदिवसाचा केक कापण्यासाठी अरबाज खान याने तलवार आणली होती. ती तलवार घेऊन तो जयजवान मित्र मंडळ लोहियानगर येथे थांबला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. युनिट १ गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन छापा घातला असता अरबाज याच्याकडून तलवारीसह १ हजार रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कार्यवाहीसाठी खडक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहरात अशाप्रकारे कोणतीही व्यक्ती रात्रीच्या वेळी चौकाचौकात गर्दी करून वाढदिवस साजरे करीत असेल आणि दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक कोयते, तलवारीने कापतात, अशा लोकांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर युनिट १ कडून कारवाई केली जाणार आहे.
ही कारवाई युनिट १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर, योगेश जगताप आणि महेश बामगुडे यांनी केली.
-----------------------------------------------------------------------