इम्रान दस्तगीर सय्यद (वय २०, रा. कोंढवा खुर्द), मुफिज जलाल मुल्ला (वय २०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), उमेर उमर खान (रा. आलिफा टॉवर, कोंढवा) आणि फरदान ताबीश सय्यद (रा. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यश बाबसाहेब सोनावणे या तरुणाला २९ मे रोजी मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार पृथ्वराज पांडुळे, मोहन मिसाळ यांना बातमी मिळाली की, सोनावणे यांना लुटणारे मिठानगर भागातील संडे बाजार मैदानात थांबवले आहेत. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या सहकार्यांनी तेथे जाऊन इम्रान सय्यद व मुफिज मुल्ला यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांचा साथीदार उमेर खान हाही बरोबर असल्याचे समजले. पोलिसांनी त्यालाही पकडले. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची २ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. तपासादरम्यान चौकशीत फरदान सय्यद याने चॅटिंग अॅपद्वारे फिर्यादी याच्याशी संपर्क साधून त्याला बोलून घेतले. सर्वांनी मिळून मारहाण करून लुटल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी फरदीन सय्यद याला अटक केली आहे. त्यांच्याकडून आरोपींनी चोरलेले मोबाईल फोनसह १ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, अभिजित रत्नपारखी, मोहन मिसाळ यांच्या पथकाने केली.