गणेश शिवाजी कारंडे (वय ३६, रा. जगदीशनगर, श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा चंद्रकांत जवळकर (वय ४८, रा. १०७२, अशोक चौक, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) या महिलेची चोरी झाली आहे. जवळकर या जिल्हा परिषद सोलापूर येथे नोकरी करतात. सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांची योगेश पाटील याच्याशी ओळख झाली होती. २६ जानेवारी रोजी कामासाठी त्या मुंबईतून पुण्यात आल्या होत्या. सकाळी ११-१५ वाजण्याच्या सुमारास त्या पुण्यात पोचल्या मात्र काम झाले नाही म्हणून त्या पुन्हा मुंबई येथे जाण्यासाठी पुणे स्टेशन येथे आल्या, त्यावेळी योगेश पाटील यांचा मोबाईलवर फोन आला व भेटण्यासाठी येतो असे सांगून काही वेळात तो स्टेशनवर पोचला मीही मुंबईला जाणार असून जेजूरी येथील एक काम आटोपल्यावर मी तुम्हाला मुंबईत सोडतो असा आग्रह त्याने केला त्यामुळे त्या कारमध्ये बसल्या.
सासवड येथे पोचल्यानंतर जवळकर यांनी योगेश पाटील याला मला उशीर होत आहे मला पुन्हा पुणे येथे सोडा असे सांगितले. त्यामुळे ते परत पुण्यात निघाले दुपारी साडेतीनच्या सुमारास दिवे घाट येथे थांबला व सांगितले की, एक मॅडम येणार आहेत त्यांच्याकडील काही कागदपत्रावर सही करायची आहे तुम्ही खाली उतरुन त्यांचेकडुन पेपर घेऊन या. जवळकर यांनी हँन्डबॅग घेऊन घेवुन कारमधुन खाली उतरत अताना बॅग कारमध्येच ठेवा असे सांगितले व त्या उतरताच त्याने पोबारा केला.
बॅगमध्ये ३५ हजार रुपये रोख, २० हजार रूपये किमतीची पुष्कराज खडा असलेली अर्धा तोळा वजनाची एक सोन्याची अंगठी व २० हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा रेनो ३ मॉडेलचा मोबाईल तसेच ओरिजनल पॅनकार्ड, आयकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, बँक ऑफ इंडिया व बैंक ऑफ महाराष्ट्रचे एटिएम आधारकार्ड झेरॉक्स, मतदानकार्ड असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज होता. त्यानंतर जवळकर यांनी ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात येथे फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून त्याचा शोध घेत त्याला अटक केली.