जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे १८ हजार ८३२ कांदा पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार नं. १ गोळा कांद्यास १० किलोस १२ ० रुपये ते १४५ रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली.
गुरुवारी प्रतवारीनुसार १० ,किलोचे बाजारभाव खालीलप्रमाणे :
कांदा नं १ (गोळा) १२० रुपये ते १४५ रुपये .
सुपर कांदा --१००,रुपये ते १२० रुपये
कांदा नं २--(कवचट ) -८० रुपये ते १०० रुपये .
कांदा नं.३--(गोल्टा) --६० रुपये ते ८० रुपये .
कांदा नं ४--(गोलटी / बदला १० रुपये ते ६०रुपये .
बटाटा बाजारभाव :
गुरुवारी ३५९ बटाटा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारीनुसार १० किलोस ३० रुपये ते १७० रुपये बाजारभाव मिळाला. या आठवड्यात बटाटा बाजारभाव स्थिर आहेत, अशी माहिती ओतूर मार्केटचे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील आठवड्यात दोन दिवस मार्केट बंद होते. हा निर्णय व्यापारी व आडतदारांनी घेतला होता.
उपबाजार आधारात कांदा बटाटा घेऊन येणाऱ्या वाहनावर प्रवेशद्वारातच सॅनिटायझरची फवारणी करुन आत प्रवेश दिला जातो. शिवाय सोशल डिस्टन्स ठेवूनच कांदा बटाटा लिलाव करण्यात येतात, अशी माहिती दीपक मस्करे यांनी सांगितले.