ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे बाजारच्या निमित्ताने जुना व नवीन कांदा ८हजार १४० कांदा पिशव्यांची आवक झाली होती. आवक कमी झाल्याने कांदा नं. १ गोळा कांद्यास प्रतवारीनुसार १० किलोस २६० ते ३२५ रुपये बाजारभाव मिळाला. या कांद्यास रविवारपेक्षा जुन्या कांद्यास १० किलो मागे २५ रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॅअड. संजय काळे व उपसभापती दिलीप डुंबरे यांनी दिली. नवीन कांदा भावात ही प्रतवारीनुसार १० किलोस ही २५ रुपयांची वाढ झाली आहे. नवीन कांदा १० किलोस ५० ते ३५० रुपये भाव मिळाला. रविवारी जुना कांदा प्रतवारीनुसार १०, किलोचे बाजारभाव खालीलप्रमाणे : कांदा नं.१ (गोळा) २६० ते ३२५ रुपये, कांदा नं. २-२०० ते ३०० रुपये, कांदा नं.३ (गोल्टा) -१५० ते २२० रुपये, कांदा नं ४ (बदला) ५० ते १५० रुपये .
बटाटा बाजारभाव : गुरुवारी बाजारच्या निमित्ताने ५३० बटाटा पिशव्यांची आवक झाली. आवक वाढल्याने बटाटा बाजारभावात घसरण झाली आहे. प्रतवारीनुसार १० किलोस ५० ते १२५ रुपये बाजारभाव मिळाला.