मेथीची अवघी ६० हजार जुड्यांची आवक झाली. इतर पालेभाज्यांचे भाव मागणी आणि पुरवठा समप्रमाणात आहे. त्यामुळे बाजारभावात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
घाऊक बाजारात कोथिंबिरीची जुडी ३ ते ६ रुपयांना, तर किरकोळ बाजारात १० ते १५ रुपयांना विक्री केली जात आहे. मेथीची घाऊक बाजारात ४ ते ७ रुपये तर किरकोळ बाजरात १० ते १२ रु
पयांना विक्री केली जात होती.
पालेभाज्यांचे घाऊक बाजारातील भाव (शेकडा जुडी ) :- कोथिंबीर : ३०० -६००, मेथी : ४००-७००, शेपू : ३००- ४००, कांदापात : ४००-६००, चाकवत : ४००-५००, करडई : ५००-७००, पुदिना १००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ६००-८००, चवळई : ५००-७००, पालक : ४००-७००, राजगिरा : ४००-५००, चुका ३००-५००.
------------------------
फोटो ओळ : १) मार्केट यार्डात रविवारी आवक झालेली कांदापात.
२) तसेच भाजीपाल्यात शेपूची मोठी आवक झाली आहे.