पळसदेव : पावसाळा गेला अन् थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे उजनी जलाशयावर पक्ष्यांचे आगमन झाले आहे. एरवी जानेवारी महिन्यात येणारे फ्लेमिंगो (रोहित पक्षी) उजनी परिसरात हजर झाले आहेत. त्यामुळे पक्षीमित्र, पर्यटक, अभ्यासक यांच्या नजरा या ठिकाणी लागल्या आहेत. फ्लेमिंगोसह विविध पक्ष्यांचे या ठिकाणी आगमन झाल्याने पक्षी पाहण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत.उजनीचे पक्षी केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी येतात. परदेशी नागरिकसुद्धा येतात. याही वर्षी या ठिकाणी हे परदेशी पाहुणे आले आहेत. या पक्ष्यांना पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी भिगवण परिसरात आले आहेत. या वर्षी उजनी जलाशयात चार हजार फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. चार महिने आधीच पक्ष्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले आहे. या पक्ष्यांबरोबरच ठिपकेवाला गरुड, पालकन (ससाणा), गारगणी (भीवई), नॉर्दन शावेलर (धापट्या), युरोसिम स्पूनबील (टामचोंचा), स्पॉट बिनस (हळदी-कुंकू), वा स्प्रे (कैकट), रीसर्च टर्न (किरकिऱ्या), इंडियन रोलर (निळकंठ) त्याचप्रमाणे तीन प्रकारचे किंगफिशर व तीन प्रकारचे आयबीच पक्षी वास्तव्य करीत असल्याची माहिती या ठिकाणी आलेल्या पक्षितज्ज्ञांनी दिली. याशिवाय, चीन येथून ‘संगोलेया’ हा पक्षीही आला आहे. हा पक्षी पाच हजार फुटांपर्यंत आकाशात उडतो. दिवाळीच्या आधी पक्षी पाहण्याची पर्वणी पक्षीमित्रांना प्राप्त झाली आहे.>अनेक ठिकाणी पक्ष्यांची शिकार होत असल्याने पर्यटकांनी चिंता व्यक्त केली आहे. पक्ष्यांची लहान पिले शिकाºयांच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. त्यामुळे बºयाच ठिकाणी मेलेल्या पक्ष्यांचे अवशेष पाहायला मिळतात.
उजनी धरणाच्या जलाशयात परदेशी पाहुण्यांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:43 AM