श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षानिमित्त सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री व वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा मंदिरामध्ये होईल. श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची सोय ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, ॲप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे ६६६.ँि४ि२ँी३ँँल्लस्रं३्र.ूङ्मे, ँ३३स्र://ु्र३.ह्ण८/ऊँ४ि२ँी३ँ-छ्र५ी, ्रडर : ँ३३स्र://ु्र३.ह्ण८/ऊँ४ि२ँी३ँ_्रस्रँङ्मल्ली_अस्रस्र अल्ल१िङ्म्र:ि ँ३३स्र://ु्र३.ह्ण८/ ऊँ४ि२ँी३ँ_अल्ल१िङ्म्र_िअस्रस्र या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय आहे.
अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाचा १२८ वा गणेशोत्सव मागील वर्षाप्रमाणे यंदाही साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातच शारदा-गजानन विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीला दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. ऑनलाईन पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी ६ वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग, सायंपूजा आणि संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती होणार आहे. मंडळाच्या ँ३३स्र२://ंह्यँ्रह्णेंल्लं्रिेंल्लंिह्ण.ङ्म१ॅ/ या वेबसाईट वरून शारदा-गजाननाचे दर्शन घेता येणार आहे.
श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ
श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते होणार आहे. दररोज सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीं ची आरती, गणेश याग, मंत्रजागर, सत्यनारायण महापूजा असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहे. ँ३३स्र://६६६.ुँं४१ंल्लँ१्र.ूङ्मे या आॅनलाईन लिंकद्वारे गणेश भक्तांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे यांनी दिली आहे.