राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या घरी निरगुडसर येथे गणपती बाप्पाचे आगमन झाले. याप्रसंगी ते म्हणाले, दरवर्षी गणेश उत्सव सण मोठ्या प्रमाणावर साजरा करत असतो. मागील वर्षापासून कोरोनाचे संकट संपूर्ण महाराष्ट्रावर व देशावर आहे. माझी सर्व गणेश भक्तांना, नागरिकांना विनंती आहे की, आपण गणेश उत्सव साजरा करत असताना साधेपणाने साजरा करावा. कोरोनाची भीती अजून आपल्या सर्वांसमोर आहे. आपण सर्वांनी मिळून गणपतीकडे एकच प्रार्थना करूया, या उत्सवाच्या निमित्ताने कोरोनाचे संकट निवारण होऊ दे. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ दे, तुमचे चांगले आशीर्वाद लाभू दे, असे म्हणून महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या आहेत.
--
फोटो क्रमांक : १०मंचर वळसे पाटील
फोटोखाली : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निरगुडसर येथील निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.