चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घट झाली. कांद्याला ८२५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बटाट्याची आवक गेल्या शनिवारच्या तुलनेत वाढून भावात वाढ झाली. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १४५00 क्विंटल झाली.
मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक ४८४0 क्विंटलने वाढली व भावात १२५ रुपयांची घट झाली. कांद्याला ८२५ ते ४00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १८४0 क्विंटल झाली. बटाट्याला १६00 रुपये प्रतिक्विंटलभाव मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण ५१६ पोती आवक झाली.
शेतीमालाची एकूणआवक व बाजारभाव पुढील प्रमाणे : कांदा - एकूण आवक - १४५00 क्विंटल. भाव क्रमांक १ : ८२५ रुपये, भाव क्रमांक २: ६५0 रुपये, भाव क्रमांक ३ : ४00 रुपये. बटाटा - एकूण आवक - १८३0 क्विंटल. भाव क्रमांक १ : १६00 रुपये, भाव क्रमांक २ : ११00 रुपये, भाव क्रमांक ३ : ५00 रुपये. भुईमूग शेंग - एकूण आवक - ४ क्विंटल. भाव क्रमांक १ :५५00 रुपये, भाव क्रमांक २ : ५000 रुपये, भाव क्रमांक ३ : ४५00 रुपये.लसूण - एकूण आवक - ६ क्विंटल.भाव क्रमांक १ : ३000 रुपये, भाव क्रमांक : २५00 रुपये, भाव क्रमांक ३ : २000 रुपये.४फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १00 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : हिरवी मिरची - ५१६ पोती ( ४000 ते ६000 रु. ), टोमॅटो - ८५९ पेट्या (१000 ते २000 रु), कोबी - २४५ पोती ( १000 ते ३000 रु), फ्लॉवर - ३६१ पोती ( ६00 ते १000 रु.), वांगी - ३९0 पोती ( १५00 ते २५00 रु), भेंडी - ५१८ पोती ( ३000 ते ४000 रु.), दोडका - २५१ डाग (४000 ते ५000 रु.), कारली - २९४ डाग (४000 ते ५000 रु), दुधीभोपळा - २९४ पोती ( १000 ते २000 रु.), काकडी - ३६८ पोती (१000 ते २000 रु.), फरशी - ४३ पोती (७000 ते ९000 रु), वालवड - २८५ पोती (३000 ते ४000 रु), गवार - १३२ पोती (७000 ते ९000 रु.), ढोबळी मिरची - ५१८ डाग ( ३५00 ते ४५00 रु.), चवळी - ४१ डाग (२000 ते ४000 रु.), वाटाणा - ७४0 पोती ( ३000 ते ४५00 रु. ), शेवगा - १४५ डाग ( ३५00 ते ४५00 रु.)४पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे : - मेथी - एकूण २७९८५ जुड्या ( ५00 ते १000 रुपये ), कोथिंबीर - एकूण १८५३0 जुड्या ( १000 ते २000 रुपये ), शेपू - एकूण ७२८४ जुड्या ( ६00 ते ८00 रुपये ), पालक - एकूण ५९९0 जुड्या ( ३00 ते ६00 रुपये ).४जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ६0 जर्शी गाईंपैकी ४0 गाईंची विक्री झाली. (१0000 ते ५0000 रुपये ), २१0 बैलांपैकी १६0 बैलांची विक्री झाली. (१0000 ते ३0000 रुपये ), ११0 म्हशींपैकी ८0 म्हशींची विक्री झाली. (२0000 ते ५१000 रुपये ), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ८७५0 शेळ्या-मेंढ्यांपैकी ७७00 शेळ्या-मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना ( १३00 ते १५000 ) रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात १ कोटी ८0 लाख रुपये उलाढाल झाली.