लहान मुलांच्या बर्थडेला गेलात तर आजकाल निघालेल्या रिटर्न गिफ्टच्या फॅडचा जरा विचार केला तर हा फॉर्म्युला रोजच्या जीवनात जगताना नेहमीच वापरला जातो तो प्रेमासाठी. कारण रिटर्न गिफ्ट देताना आपण ज्याचा बर्थडे आहे व्यक्तीला जे गिफ्ट देतो त्याच्या बदल्यात आपल्याला मिळणारे रिटर्न गिफ्ट हे जरा कमी किमतीचे असते. या फॉर्म्युलाला कोणीही वैयक्तिक घेऊ नये. या फॉर्म्युल्याचा फक्त आयुष्यातील काही मन निराश करणाऱ्या घटना घडतात, तेव्हा ह्याचा उपयोग होईल आणि निराश झालेले मन कलाटणी घेत हसू मध्ये बदलेल. जस्ट ट्राय इट....
बर्थडेचे गिफ्टचा फॉर्म्युला प्रेमासाठी कसाकसा असा विचार केला तर लक्षात येईल प्रेमाचे असेच असते. अगदी सगळ्याच नात्यात आपण एखाद्यावर खूप प्रेम करतो किंवा जीव लावतो समोरून तेवढेच प्रेम मिळेल असे नाही. सेम लाईक बर्थडे रिटर्न गिफ्ट फॉर्म्युला.
आपण गिफ्ट देऊ तसे मिळेलच असे नाही ना त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कधी असा अनुभव आला तर मन दुखी चिंतित किंवा स्वतःला त्रास होऊ देऊ नका आणि त्याच्यापुढे जाऊन जर आपण कोणाला खूप जीव लावला आणि किंवा प्रेम केले समोरून प्रेमच मिळाले नाही किंवा द्वेष मिळाला तर समजावे की रिटर्न संपले असावे होऊ शकते ना असे आणि वरील फॉर्म्युला डोळ्याचा मांडला तर अवघड काहीच नाही स्वतःला सांभाळायला.
त्यामुळे आपण फक्त गिफ्ट द्या रिटर्न गिफ्टमध्ये काय किंवा मिळते की नाही, विचार नका करू.
-सौ. अनुष्का नीलेश तळेगावकर