बारामती एमआयडीसीत ‘कृत्रिम’पाणीटंचाई; उद्योगांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 04:58 PM2020-06-06T16:58:25+5:302020-06-06T16:59:24+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून बारामती एमआयडीसी मधील अनेक विभागांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.
बारामती : बारामतीएमआयडीसीत कृत्रिम पाणीटंचाई झाल्याचे चित्र आहे.अगोदरच कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योगांना अक्षरशा टँकरने पाणी विकतघेण्याची वेळ आली आहे. बारामती एमआयडीसी मध्ये त्वरित नियमित व पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या वतीनेकरण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बारामती एमआयडीसी मधील अनेक विभागांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. विशेषत जी भागात हे चित्र अधिक गडद आहे.लॉकड़ाऊन कालावधीत उदयोग बंद असल्याने हा प्रश्न फारसा गंभीर नव्हता.परंतु उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर पाणीपुरवठ्याची
समस्या तीव्र एमआयडीसी कड़न परेसा व नियमित पाणीपरवठा न झाल्यानेउदयोगांना पाण्यसाठी मोठी किंमत मोजून टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागतआहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत आहे.त्यातच आता पाणीही टँकरद्वारे विकत घ्यावे लागत असल्याने उद्योजकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. एमआयडीसी पाणी पुरवठा विभागाकडे उदयोजक वारंवारतक्रारी करत आहेत .परंतु संबंधितांचा प्रतिसाद मिळत नसल्याची उद्योजकांचीतक्रार आहे.उजनी जलाशयात पुरेसा पाणीसाठा असताना देखील एमआयडीसी बारामतीऔदयोगिक क्षेत्रात निष्काळजी व गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा करू शकत
नाही ही वस्तुस्थिती आहे. औदयोगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा त्वरित सुरळीतकरावा अन्यथा उद्योजकांना नाईलाजाने कायदेशीर मागार्ने आंदोलन करावेलागेल,असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत असोसिएशन चे प्रमुख धनंजय जामदार,उपाध्यक्ष शरद सुर्यवंशी, सचिव अनंत अवचट, खजिनदार राधेश्याम सोनार, सदस्य मनोहर गावडे, महादेवगायकवाड, संभाजी माने, शेख वकील, चारूशिला धुमाळ, हरिष कुंभरकर, धनंजय धुमाळ आदींनी बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जोशी यांनानिवेदन दिले.
उजनी जलाशयामधील एमआयडीसी ला पाणीपुरवठा करणाºया जॅकवेलचे खोल नदीपात्रातनुकतेच स्थलांतर करण्यात आले आहे. त्याची चाचणी चालू आहे. नविन जॅकवेल व्यवस्थित कार्यांन्वीत होताच विस्कळीत पाणीपुरवठा वैयक्तिक लक्ष घालूनतातडीने नियमित करण्यात येईल अशी ग्वाही, कार्यकारी अभियंता जोशी यांनीया प्रसंगी शिष्टमंडळाला दिल्याचे असोशिएशन चे अध्यक्ष जामदार यांनीसांगितले. पाणीपुरवठा व्यवस्थित करण्याची कार्यवाही त्वरित न झाल्यासबारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे पदाधिकारीउपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचे अध्यक्ष धनंजय जामदारयांनी यावेळी सांगितले.
उजनी जलाशयात पुरेसा पाणीसाठा असताना देखील एमआयडीसी बारामती औदयोगिक क्षेत्रात निष्काळजी व गलथान कारभारामुळे पाणीपुरवठा करू शकत नाही हीवस्तुस्थिती आहे. ऊद्योगांना त्वरित नियमित व पुरेसा पाणीपुरवठा झालाचपाहिजे.बारामती औदयोगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावाअन्यथा उद्योजकांना नाईलाजाने कायदेशीर मागार्ने आंदोलन करावे लागेल,असेनिवेदनात म्हटले आहे.
———————————