आंधळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत घडशी भैरवनाथ जनसेवा ग्रामविकास पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले होते. त्यानंतर झालेल्या पॅनलप्रमुखांच्या बैठकीत सरपंचपदासाठी अरुणा ओव्हाळ तर उपसरपंचपदासाठी सुभाष सरोदे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानुसार निवडणुकीदरम्यान सरपंचपदासाठी ओव्हाळ व उपसरपंचपदासाठी सरोदे यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने सरपंचपदी अरुणा ओव्हाळ तर उपसरपंचपदी सुभाष सरोदे बिनविरोध निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. चासकर यांनी जाहीर केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. के. बांदल यांनी कामकाज पाहिले .
निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरपंच अरुणा ओव्हाळ उपसरपंच सुभाष सरोदे तसेच आंधळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधून सलग पाच वेळा निवडून आलेले पॅनलप्रमुख व माजी सरपंच विजय कुसेकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच अरुणा ओव्हाळ व उपसरपंच सुभाष सरोदे यांनी सांगितले. आभार माजी उपसरपंच ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मानले.
बातमीला फोटो आहे .
अरुणा ओव्हाळ
सुभाष सरोदे