पुणे : “जातीवाद, धर्माची सर्कस अजून संपलेली नाही. जातीधर्माच्या दहशतीखाली सत्ता गाजवली जात आहे. एका संकुचित विचारसरणीत अडकवून ठेवले जात आहे. याविरोधात एकजुटीने लढा उभारावा लागेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरुद्ध सत्यशोधक रेझिस्टन्स (एसएसआर) अर्थात द्वेष विरुद्ध प्रेमाची लढाई उभी करावी लागेल,” असे आवाहन आंतरराष्ट्रीय लेखिका अरुंधती रॉय यांनी शनिवारी केले. कोरेगाव भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियानातर्फे आयोजित ‘एल्गार परिषदे’त त्या बोलत होत्या. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ आदी उपस्थित होते. ब्राह्मण्यवाद, भांडवलशाही व पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात ‘एल्गार’ करण्याची गरज रॉय यांनी अधोरेखित केली.रॉय म्हणाल्या, “पेशवाई गेली, मात्र ब्राह्मण्यवाद गेला नाही. एकविसाव्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण्यवादाचे नेतृत्व करतो. मोदींच्या रूपात हे नेतृत्व दिल्लीच्या सत्तेवर बसले आहे. मोदी काँग्रेसच्या वंशवादावर बोलताना दमत नाहीत; मात्र अंबानी, अदानी यांच्यासारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील घराणेशाहीला सढळ मदत करतात, हा विरोधाभास आहे. भांडवलशाहीमुळे देशात विषमता वाढीस लागली आहे. कोरोना काळात कोट्यवधी लोकांनी रोजगार गमावला, याच वेळी भारतातील श्रीमंतांची संपत्ती वाढत होती. कॉर्पोरेट वर्गाकडे सर्व सुविधा एकवटल्या आहेत.”अरुंधती रॉय म्हणाल्यादिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. कृषी विधेयके तातडीने मागे घेतली जावीत.आपल्याकडे राजकीय विचार, जात, धर्म यावर शिक्षा ठरवली जाते. भडकाऊ विधान करणारे लोक, टीव्ही अँकर खुलेआम फिरत आहेत आणि वकील, विचारवंत यांना तुरुंगात डांबले जात आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी अटक केलेल्या सर्वांना त्वरित मुक्त केले जावे. ‘एल्गार’ म्हणजे युद्धाचे आव्हान“एल्गार म्हणजे युद्धाचे आव्हान. हे युद्ध विषमतावादी ब्राह्मण व्यवस्थेविरुद्धचे आहे. आजही आपण ब्राह्मणांच्या कचाट्यात आहोत. यातून बाहेर पडायचे असेल तर इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि मीडिया हातात घ्यायची गरज आहे,” असे मुश्रीफ म्हणाले. कोळसे पाटील यांनी सांगितले की, आपण मालक होऊ शकत नाही; कारण आपण संघटित नाही. ‘ते’ बरोबर नियोजन करतात आणि आपण भांडत बसतो. मनुवाद आणि ‘मनी’वादाला संपवले पाहिजे.
‘आरएसएस’च्या द्वेषाविरुद्ध प्रेमाचा लढा, अरुंधती रॉय यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 6:14 AM