पुणे: वीजबिल भरलेले नाही म्हणून पॉवर सप्लाय बंद केला जाईल असा व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवून एकाकडून ९९ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मुकेश मथुरा कुमार (४५, रा. कोरेगाव पार्क) यांच्या व्हाट्सऍप वर मेसेज पाठवला. वीजबिल भरलेले नाही म्हणून पॉवर सप्लाय बंद केला जाईल असा मजकुर त्या मेसेजमध्ये होता. मुकेश यांनी त्या मोबाईल नंबर वर फोन केला असता एक मेसेज फॉरवर्ड करावा लागेल असे त्यांना सांगितले. त्यांनतर काही वेळाने लिंक पाठवत त्यावर क्लिक केले असता मुकेश यांच्या मोबाईल चा संपूर्ण ऍक्सेस आरोपीला मिळाला. मोबाईल ऍक्सेसचा वापर करून आरोपीने मुकेश यांच्या अकाउंट मधून ९९ हजार ९९० रुपये ट्रान्स्फर करून घेतले. या प्रकरणी मुकेश यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ करत आहेत.