महुडे : भोर तालुक्यात कोरोनाचा कहर झाला असून शुक्रवारी दिवसभरात तालुक्यातील २८ गावात ४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तालुक्यात आज अखेर रुग्णसंख्या ३००१ झाली असून ५०२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी सूर्यकांत कराळे यांनी सांगितले. भोर तालुक्यात २४१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या २८ गावात माळवाडी ३, उत्रोली २, आळंदे १, अंबाडे २, चिखलगाव १, देगाव १, धांगवडी १, केळवडे २, कामथडी १, कांजळे ४, कारी १, कर्णावड १, खानापुर १, कोर्ल २, माकोशी १, मोहरी बु.१, नसरापूर १, निगडे१, पिसावरे १, पोळवाडी १, साळवडे १, संगमनेर२, ससेवाडी १, सावरदरे १, शिंदेवाडी १, टीटेघर १, वडगाव १, भोर १२, असे एकूण ४९ कोरोनाबाधितांचा यात समावेश आहे दरम्यान भोर तालुक्यात ३७ हजार ५७० लसीकरण झाल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.
कोरोनाबाधितांचा चढता आलेख. महुडे वार्ताहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:10 AM