शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

Ashadhi Vaari : आळंदीत वारकऱ्यांची लगबग वाढली; अलंकापुरी माऊलींच्या पालखी प्रस्थानासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 10:28 AM

वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे...

- भानुदास पऱ्हाड

आळंदी (पुणे) : संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखीचे रविवारी (दि.११) सायंकाळी चारला तीर्थक्षेत्र आळंदीतून प्रस्थान होणार आहे. माऊलींच्या वैभवशाली सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तसेच हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. तत्पूर्वी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.

आळंदीत पालखी प्रस्थान सोहळयाच्या एक - दोन दिवस अगोदर असंख्य वारकरी येत असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी नदीपलीकडील जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यावर पत्रे टाकले आहेत. या दर्शनबारीतून वारकऱ्यांना इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलमार्गे मंदिराकडे दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही दर्शनबारी उभारली आहे. त्याद्वारे भाविकांना माऊलींच्या समाधीचे सुलभ दर्शन घेता येईल अशी व्यवस्था केली आहे.

दरम्यान आळंदीत दाखल झालेले भाविक ग्रंथ वाचण्यात दंग दिसून येत आहेत. सिध्दबेटमध्ये अजान वृक्षाखाली शीतल छायेत काही भाविक पारायण करत आहेत. आळंदीमधील तुळशी, हार, फुलांची, वारकरी साहित्य मृदुंग, वीणा, टाळ, पेटी, ग्रंथ साहित्य इ. विविध दुकाने सजली आहेत.

पाणीपुरवठा : वारकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने शहरात विकेंद्रित पद्धतीने ५ टँकर फिलिंग ठिकाणांची व्यवस्था केली आहे. या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा व कर्मचारी २४ तास असावेत असे आदेश मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी निर्गमित केले आहेत. वारी काळात एकूण २२ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जलशुद्धीकण केंद्राची स्वच्छता, मोटारींची दुरुस्ती करण्यात आली आहे. शहरात लावलेल्या शौचालयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र पाईप लाईन टाकून काम करून घेण्यात आले आहे.

विद्युत विभाग : शहरातील मंदिर व इंद्रायणी घाट परिसरातील तसेच इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणचे एकूण १७ हायमास्ट दिवे चालु केले आहे. शहरातील मोबाईल टॉयलेट यांना विद्युत व्यवस्था करून देण्यात आली आहे. रस्त्यावरील दिवाबत्तीची दुरुस्ती करून रात्रीच्या वेळी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणी पुरवठा केंद्राच्या ठिकाणी २५० के.व्ही.ए क्षमतेचे जनरेटरची व्यवस्था पालिके मार्फत करण्यात आली आहे.

आरोग्य विभाग : आषाढी वारी कालावधीत गर्दीच्या अनुषंगाने शहरात निर्माण  होणाऱ्या घनकचरा, रस्ते साफसफाई, औषध फवारणी, धुर फवारणी कामे तीन शिफ्टमध्ये करणेत येणार आहेत. नगरपरिषदेच्या १२ घंटागाड्या, ३ कॉम्पाक्टर, ५ टॅक्टर, सक्शन मशीन इत्यादी वाहनांसह साधारण १०० सफाई कर्मचारी २४ तास तैनात असणार आहेत. वारी संपल्यानंतरच्या स्वच्छतेबाबतचे नियोजन देखील केले आहेत. शहरातील नगरपरिषद मालकीचे सर्व सार्वजनिक शौचालय एकूण ३५६ सिट्स, सुलभ शौचालयाच्या एकूण ४९० सिट्ससह, १५०० मोबाईल टॉयलेट्स भाविकांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच ते वापरण्या योग्य राहतील यासाठी पालिकेने तयारी केली आहे. शहरात संसर्गजन्य रोग पसरू नये या करीता शहरात नियमितपणे जंतू नाशक फवारनी व धुर फवारणी केली जात आहे.

बांधकाम विभाग :  आळंदी शहरात आवश्यक त्या सर्व ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

अतिक्रमण कारवाई : वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर व सर्व महत्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण पालिकेमार्फत काढून घेतली आहेत.

पोलीस मदत, टेहळणी केंद्र स्थापन....वारीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून आळंदीतील प्रमुख चौक तसेच आवश्‍यक त्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र, टेहळणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यावर्षी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी - चिंचवड आयुक्तालयाकडून ३ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलिस निरीक्षक, १६० उपनिरीक्षक, १८२२ अंमलदार, ३३९ वाहतूक अंमलदार, १ हजार होमगार्ड नेमण्यात आले आहेत. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या ४ तुकड्या, बीडीडीएसचे ४ पथक, चोरी नियंत्रण १२ पथके, छेडछाडची २ पथके व दामिनी ४ पथके मदतीला पाचारण करण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तर पालिकेचेही १३० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ३ मोठ्या स्क्रीन बसविण्यात आले असून पोलिस यंत्रणेस चोरीच्या घटना रोखण्यात व इतर तपासात याची मोठी मदत होणार आहे.

आळंदी आरोग्य केंद्र उपाययोजना : आळंदीत भाविकांच्या सेवेसाठी जादा ९ वैद्यकीय अधिकारी, १६ स्टाफ नर्स, ९ लॅब टेक्निशियन, ५ एक्सरे टेक्निशियन, ५ परिचर, सफाई कामगार, २५ प्रशिक्षणार्थी डॉक्टर, ५ फार्मसिस्टची नेमणूक करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.

* आषाढी यात्रा निमित्ताने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण भूलतज्ज्ञ डॉ. पाटीलयांच्याकडून देण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी शहरात आरोग्यसेवकांकडून जनजागृती करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे शीतकक्ष स्थापन करण्यात आले आहे. अत्यावश्यक संदर्भ सेवेसाठी १०२/ १०८ अंबुलन्सेस तयार ठेवण्यात आल्या आहेत.

* वारीकाळात भाविक व वारकऱ्यांना स्वच्छ व शुध्द खाद्य पदार्थ मिळावे यासाठी हॉटेल चालकांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच हॉटेल कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यात आली आहे.

जादा बसेस...संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी येथे जादा बस  पीएमपीएमएलकडून ठेवण्यात आल्या आहेत. आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून प्रतिदिनी एकूण १४२ बसेस संचलनात राहणार आहेत. आळंदीसाठी रविवारी (दि.११) रात्री बारा वाजेपर्यंतपर्यंत ही व्यवस्था करण्यात आली आहे. तर १२ जूनला पहाटे अडीचपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा या ठिकाणावरून आळंदीला जाण्यासाठी जादा १८ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAlandiआळंदीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022