शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

VIDEO | डोळ्यांचे पारणे फेडणारा तुकोबांच्या पालखीचा इंदापूरात रंगला गोल रिंगण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 3:16 PM

वार्‍याच्या वेगाने सुसाट धावणार्‍या आश्वांचा लाखो वारकर्‍यांनी याची देही याची डोळा अणुभवला थरार....

इंदापूर : पुंडलिक वरदा हरि विठ्ठलच्या गजरात आकाशात फडफडणार्‍या पतका आणि तुकाराम-तुकारामच्या जयघोषात लक्ष लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणारे, अभुतपुर्व उत्साहाचे जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण सोहळा इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर शनिवार दि.२ जुलै रोजी दुपारी पार पडला. क्षणार्धात वार्‍याच्या वेगाने सुसाट धावणार्‍या मानाच्या आश्वांचा लाखो वारकरी, भक्तांनी व ग्रामस्थांनी याची देही, याची डोळा थरार अणुभवला.

इंदापूरातील गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी व या सोनेरी क्षणाची आठवण मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी लाखो वारकरी, ग्रामस्थ भक्तांचा जनसागर रिंगण ठिकाणी उसळला होता. रयत शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर गोल रिंगण आणि त्यात दिंड्यानी प्रवेश करण्यासाठी मार्ग अगोदरच आखणी केलेला असल्याने रिंगण मैदानाच्या मध्यभागी मंडपातील चौथर्‍यावर पालखी विराजमान झालेली होती. तेथून काही अंतरावर अश्व धावण्यासाठी रिंगण आखले होते.तर मधल्या जागेत दिंड्या आणि रिंगणाबाहेर वारकरी व भाविक थांबले होते.

भक्तिच्या वाटेवर गाव तुझे लागले। आशिर्वाद घेण्यासाठी मन माझे थांबले।।

तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहु दे। पांडुरंगा माझ्या मानसांना नेहमी तुझ्या सहवासात राहुदे।।

रिंगण सोहळ्यात सर्वप्रथम रिंगणात पताकावाले धावले. त्यानंतर डोक्यावर हंडा व तुळशी वृदांवन घेतलेल्या महिला वारकरी धावल्या. त्यानंतर विणेकरी, मृदुंगवादक व टाळकरी एका पाठोपाठ एक याप्रमाणे धावत पालखीला प्रदक्षिणा घालून रिंगणातील फेर पूर्ण केली. शेवटी तुकोबारायांचा मानाचा व मोहिते पाटलांचा स्वाराचा अश्व रिंगणात आला. मान्यवरांच्या हस्ते मानाच्या अश्वांची पुजा करण्यात आली. क्षणार्धात अश्व रिंगण पूर्ण करण्यासाठी धावला.

डोळ्याचे पाते लवते न लवते तोच दोन्ही अश्वांनी वार्‍याच्या वेगाशी स्पर्धा करून पहीली दौड पूर्ण केली. क्षणार्धातच रिंगण फेर्‍या पूर्ण केल्या. पुंडलिक वरदा हरि विठ्ठलचा जयघोष आसमंत दुमदुमला. लक्ष लक्ष डोळ्यांचे पारणे फेडणारा इंदापूरातील गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. अश्व धावताना त्याच्या टापाखीलील मातीचा टीळा वारकरी, महिला वारकरी भक्तिभावाने कपाळी लावून दर्शन घेण्यात मग्न झाल्याचे दिसून येत होते. रिंगण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही अश्वांनी पालखीचे दर्शन घेतले. पालखी रिंगण मैदानात आल्यानंतर रिंगण मैदानाला पालखीने फेरा मारला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पालखी रथामध्ये बसून पालखीचे सारथ्य केले.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे पूणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा, नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर तहसिलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरिक्षक तय्यब मजावर, सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील, पांडुरंग शिंदे, आणिल ठोंबरे, धनंजय पाटील, कैलास कदम, अनिकेत वाघ, धनंजय बाब्रस, ऍड.राहल मखरे, शिवाजीराव मखरे, वाशाल बोंद्रे, अतुल शेटे, राजकुमार राऊत, सनिल अरगडे, इत्यादी प्रमख उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा