शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Ashadhi Wari: पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही, ड्रोनची नजर; विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 8:02 PM

बारामतीमधील शारदा प्रांगणात रविवारी (दि. १८) पालखी सोहळा विसावणार आहे...

बारामती (पुणे): संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीचा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी (दि १६) बारामतीत भेट देत आढावा घेतला. पालखी सोहळ्यात विशेष खबरदारी म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा, ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे फुलारी यांनी सांगितले.

येथील शारदा प्रांगणात रविवारी (दि. १८) पालखी सोहळा विसावणार आहे. येथील व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, बारामती शहरचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, नगरपरिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख सुनील धुमाळ, आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. फुलारी पुढे म्हणाले, पालखी सोहळ्यात साध्या वेषात एलसीबीचे पथक तैनात आहे. महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी वेगळे पथक कार्यान्वित राहणार आहे. गुन्हे घडणार नाहीत याची पूर्णतः खबरदारी घेतली जात आहे.

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व अन्य पालखी सोहळे सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आहेत. यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. साध्या वेषातही पोलिस कार्यरत आहेत. मुंबईसह अन्य ठिकाणचा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. विविध पथके कार्यरत आहेत. हजारोंच्या संख्येत पोलिस मनुष्यबळ उपलब्ध आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

पोलिसांना पोलिस प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच दर्शनासाठी महिला व भाविकांची वेगळी रांग करण्यात आली आहे. पुणे पोलिस ग्रामीण पोलिस दलाने उत्कृष्ट नियोजन केले असून चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात असल्याचे फुलारी म्हणाले. दरम्यान, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात फुलारी यांनी यवत ते बारामती असा प्रवास केला. तसेच पालखी मुक्काम व सुरक्षितता याविषयीची माहिती जाणून घेतली.

टॅग्स :Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही