पुणे : आषाढी एकादशी म्हटली की, पंढरपूर आणि विठू माऊलीची मूर्ती डोळ्यासमोर येते. राज्यभरातून लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत पायी पंढरपूरला येतात. संपूर्ण राज्यात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. यावर्षी आषाढी एकादशी १० जुलै रोजी आहे. यानिमित्त मध्य रेल्वेने वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आषाढी एकादशीला मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या सुटणार आहेत.
आषाढी स्पेशल रेल्वे वेळापत्रक
१) लातूर - पंढरपूर - ०११०१ (६ फेऱ्या) - ५, ६, ८, ११, १२ आणि १३ जुलै रोजी.
२) पंढरपूर - लातूर - ०११०२ (६ फेऱ्या) - ५, ६, ८, ११, १२ आणि १३ जुलै रोजी.
३) मिरज - पंढरपूर - ०११०७ (१० फेऱ्या) - ५ ते १४ जुलै दररोज.
४) पंढरपूर - मिरज - ०११०८ (१० फेऱ्या) - ५ ते १४ जुलै दररोज.
५) मिरज - कुर्डूवाडी - ०११०९ (१० फेऱ्या) - ५ ते १४ जुलै दररोज.
६) कुर्डूवाडी - मिरज - ०१११०(१० फेऱ्या) - ५ ते १४ जुलै दररोज.
७) पंढरपूर - मिरज - ०११११ (४ फेऱ्या) - ४, ५, ९ आणि ११ जुलै रोजी.
८) मिरज - पंढरपूर - ०१११२ (४ फेऱ्या) - ४, ५, ९ आणि ११ जुलै रोजी.
९) सोलापूर - पंढरपूर - ०१११३ (१० फेऱ्या) - ५ ते १४ जुलै दररोज.
१०) पंढरपूर - सोलापूर - ०१११४ (१० फेऱ्या) - ५ ते १४ जुलै दररोज.
११) नागपूर - मिरज - ०१११५ (२ फेऱ्या) - ६ आणि ९ जुलै रोजी.
१२) मिरज - नागपूर - ०१११६ (२ फेऱ्या) - ७ आणि १० जुलै रोजी.
१३) नागपूर - पंढरपूर - ०१११७ (२ फेऱ्या) - ७ आणि १० जुलै रोजी.
१४) पंढरपूर - नागपूर - ०१११८ (२ फेऱ्या) - ८ आणि ११ जुलै रोजी.
१५) नवीन अमरावती - पंढरपूर - ०१११९ - (२ फेऱ्या) - ६ आणि ९ जुलै रोजी.
१६) पंढरपूर - नवीन अमरावती - ०११२० - (२ फेऱ्या) - ७ आणि १० जुलै रोजी.
१७) खामगाव - पंढरपूर - ०११२१ - (२ फेऱ्या) - ७ आणि १० जुलै रोजी.
१८) पंढरपूर - खामगाव - ०११२२ - (२ फेऱ्या) - ८ आणि ११ जुलै रोजी.