निगडाळे येथे झालेल्या समारंभात सामाजिक कार्यकर्ते शांताराम लोहकरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष मारुती लोहकरे, माजी सरपंच दीपक चिमटे, नामदेव गायकवाड, सुरेश तिटकारे, मारुती तळपे, नामदेव कोंढवळे, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड, युवा नेते विनायक लोहकरे, संतोष लोहकरे, दत्तात्रय लोहकरे, शामराव तिटकारे, मुख्याध्यापक संतोष थोरात, शिक्षिका अलका गुंजाळ, अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे, लीलाबाई लोहकरे, कामगार संस्था अध्यक्ष नीलेश लोहकरे, ज्ञानेश्वर लोहकरे, उमेश लोहकरे, तुषार लोहकरे, वनमजूर भीमाशंकर अभयारण्य, सम्यक बौद्ध विहार ट्रस्ट व साईनाथ तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामसेवक अशोक शेवाळे यांनी सात वर्षे सेवा काळात आपले प्रशासकीय कौशल्य वापरून गावात विविध लोकोपयोगी योजना आणून कार्यान्वित केल्या. सर्वात जास्त घरकुल योजनांचा लाभ येथील लोकांना मिळाला. यात शबरी आवास योजना, रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना, यशवंत घरकुल योजना, अपंगाना घरकुल या योजनांचा समावेश होता. मनरेगा अंतर्गत ‘घर तेथे गोठा’ व ‘घर तेथे शोषखड्डा’ ही योजना प्रभावी ठरली. वैयक्तिक लाभामध्ये ताडपत्री, पिठाची गिरणी, शेती अवजारे आदी योजना नागरिकांना उपयुक्त ठरल्या.
१८ तळेघर
निगडाळे येथे ग्रामसेवक अशोक शेवाळे यांचा सन्मान करताना मान्यवर.