लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे डांबरीकरण उखडले आहे. या दुरवस्था झालेल्या रस्त्यांवरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वाहतूक करावी लागते. यामुळे त्यांना योग्य वेळेत बाजारात पोहचता येत नाही. यामुळे त्याच्या मालाचे नुकसान होत असल्यामुळे तालुक्यातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खांडगे पाटील, अंबादास हांडे, संजय भुजबळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
योगेश तोडकर, नवनाथ भांबेरे, प्रवीण डोंगरे पाटील, संतोष भांबेरे हे प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधितांना निवेदने देण्यात आले. पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील सातपीरबाबा रस्ता, पिंपळगाव-शिवरस्ता, जुन्या केटी वेअरवरून रामोसवाडीकडे जाणारा रस्ता, रावळपिंडी समाज मंदिर रस्ता, जुन्नर-नारायणगाव रस्ता, पिंळगाव फाटा ते मीना नदीवरील पूल, श्रीराम सेतू कुलस्वामी खंडेराय मंदिर रस्ता, गुंजाळवाडी आर्वी कॅनॉल रस्ता, तोडकरमळा रस्ता, गुंजाळवाडी पिंपळगाव-शिवरस्ता, गारमळा-खांडगेमळा, सावरगाव-पिंपळगाव शिवरस्ता खराब झाला आहे. या रस्त्यांवरून शेतकऱ्यांच्या पिकांची व शेतीमालाची वाहतूक होत असते. ग्रामस्थांचीही या रस्त्यावरून कायम वर्दळ असते. मात्र, रस्ता खराब असल्याने येथून येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होत असल्याने या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. नियोजन समिती सदस्य विकास दरेकर, किसन सेल अध्यक्ष राजेश गावडे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष पिंपळगाव रंगनाथ गुळवे, महात्मा गांधी तंटामुक्ती उपाध्यक्ष अनंत खांडगे पाटील, भाजपा उपाध्यक्ष रमेश वायकर, आरपीआय अध्यक्ष गौतम लोखंडे यांच्यासोबत शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीनी चर्चा केली.
फोटो : रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावेत या संदर्भात गुंजाळवाडी, आर्वी ग्रामपंचायतीचे सरपंच रेश्मा वायकर व उपसरपंच रमेश ढवळे यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे पाटील, अंबादास हांडे, संजय भुजबळ.
170821\screenshot_20210817-120312__01.jpg
रस्ते डांबरीकरण करावेत या संदर्भात गुंजाळवाडी आर्वी ग्रामपंचायतचे सरपंच रेश्मा वायकर व उपसरपंच रमेश ढवळे यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे पाटील, अंबादास हांडे , संजय भुजबळ .