Pune: काँग्रेस भवनमधील मारहाण प्रकरण, परस्परांविरोधात तक्रार; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 08:35 AM2024-02-05T08:35:51+5:302024-02-05T08:37:26+5:30
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल...
पुणे :काँग्रेस भवनमध्ये शनिवारी दुपारी एनएसयूआय या काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल्ल पिसाळ (रा. कोथरूड) यांनी फिर्याद दाखल केली.
पोलिसांत तक्रार दिलेल्या तक्रारीनुसार ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, भूषण रानभरे आणि युवराज नायडू यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५०४, ५०६ आणि ३४ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते शनिवारी काँग्रेस भवन येथे जमले होते. शहराध्यक्ष पदावरून संघटनेत दोन गट पडले आहेत. पक्षातीलच वेगवेगळ्या.वरिष्ठ नेत्यांचे हे गट समर्थक आहेत. पिसाळ यांच्या तक्रारीनुसार त्यांना ‘एनएसयूआय’च्या पदाधिकाऱ्यांनी हाताने, कडे तसेच विटेने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.