पुणे : दारू पिण्यासाठी पैसे आणि पाण्याची बाटली न दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना जनता वसाहतीत बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
राकेश दत्ता आवळे (वय २६, रा. जयभवानीनगर, जनता वसाहत, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भीमराव बंजारा (वय २९, जनता वसाहत, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे.
बंजारा हे मेहुणे प्रकाश बंजारा यांच्यासह त्यांच्या शक्ती सुपर मार्केट या दुकानात गेले होते. त्याठिकाणी आलेल्या आरोपी आवळे आणि त्याच्या तीन साथीदारांनी दोघांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तसेच पाण्याची बाटली मागितली. त्यांनी पैसे आणि पाण्याची बाटली देण्यास नकार दिला. चिडलेल्या आरोपींनी त्यांना दगडाने, लोखंडी पाइपाने मारहाण करीत धारदार हत्याराने वार केले. पुढील तपास सहायक निरीक्षक एन. आर. केंचे करीत आहेत.