शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

देसाई महाविद्यालयात भरली विद्यार्थ्यांची विधानसभा

By admin | Published: February 14, 2015 11:56 PM

लक्षवेधी सूचना या माध्यमातून एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी हुबेहूब विधानसभा साकारली.

पुणे : अनधिकृत बांधकामे... महिलांवरील अत्याचार... शेतकरी आत्महत्या अशा अनेक विषयांवर विरोधकांनी विचारलेले प्रश्न, त्याला सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आलेली उत्तरे, सरकारच्या निषेधार्थ विरोधी पक्षाने केलेला सभात्याग, मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचना या माध्यमातून एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी हुबेहूब विधानसभा साकारली.महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमातील संसदीय कामकाजाची विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती मिळावी याकरिता एच. व्ही. देसाई महाविद्यालयात अभिरूप विधानसभेचे आयोजन करण्यात आले होते. कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी विरोधी पक्ष, सत्ताधारी, अध्यक्ष अशा विविध भूमिका पार पाडल्या. चालू घडामोडींवर मार्मिक भाष्य करीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुगलबंदी रंगली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एस. पठाडे, डॉ. गणेश राऊत, ए. पी. कुलकर्णी, प्रा. पीयूष पहाडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. नीता बोकील व निनाद कुलकर्णी यांनी याचे आयोजन केले. विरोधी पक्षाचे काम पार पाडणाऱ्या संघास उत्कृष्ट संघाचे पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर अमर शिंदे, नेहा रत्नपारखी यांना प्रथम, गणेश नवले व सारिका शिळीमकर यांना द्वितीय, शुभम जोशी व रूपाली भोसले यांना तृतीय, पूजा वाघमारे व प्रणिता राणावत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.