पुणे : कोरोनामुळे बेजार झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी सामाजिक संस्था पुढे येत आहेत. तशाच प्रकारे नगरसेवकही स्वतःच्या खर्चातून मदत उभी करीत आहेत. नगरसेवक धीरज घाटे यांच्या निधीमधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि व्हेंटिलेटरची मदत करण्यात आली. यासोबतच महिलांना आणि रिक्षाचालकांसाठीही मदत करण्यात आली.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कोरोनाग्रस्त रुग्णांना घरामध्ये वापर करण्यासाठी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्यात येणार आहेत. यावेळी भाजपाचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेविका स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, नगरसेवक रघुनाथ गौडा, प्रमोद कोंढरे, मनिषा धनंजय घाटे उपस्थित होत्या. यासोबतच कोविड सेंटरला व्हेंटिलेटर देण्यात आला. वीस गरजू महिलांना शिलाई मशीनची मदत करण्यात आली. तसेच, शंभर रिक्षाचालकांना धान्य शिध्याची मदत करण्यात आली. नवी पेठेतील रिक्षा स्टँडजवळ हा कार्यक्रम पार पडला.