आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मांडवगण फराटा येथील ग्रामस्थांनी कोल्हापूर, सांगली रत्नागिरी या भागातील पुरग्रस्तांसाठी १० क्विंटल गहू, साखर, तांदूळ तसेच एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये मदत केली. ग्रामस्थांच्या वतीने सुजाता पवार यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. या वेळी पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, पोलीस पाटील बाबा पाटील फराटे, दत्तात्रय फराटे, सरपंच शिवाजी कदम, संभाजी फराटे, मनीषा सोनवणे, शरद चकोर, राजेंद्र जगताप उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक :१० रांजणगाव सांडस मांडवगण फराटा मदत
फोटो ओळी : पूरग्रस्तांसाठी मदतीचा धनादेश सुजाता पवार यांच्याकडे सुपूर्द करताना मांडवगण फराटा ग्रामस्थ.
100821\10pun_9_10082021_6.jpg
फोटो क्रमांक :१० रांजणगाव सांडस मांडवगण फराटा मदत फोटो ओळी : पूरग्रस्तांसाठी मदतीतीचा धनादेश सुजाता पवार यांच्या कडे सुपूर्द करताना मांडवगण फराटा ग्रामस्थ.