पुणे : काही शास्त्र ही गणित स्वरुपाची तर काही दिशादर्शक असतात़ दिशादर्शक शास्त्रात गणित महत्वाचे नसते आणि आपल्या कुवतीनुसार भविष्याचा अर्थ लावायचा असतो़ शास्त्राच्या माध्यमातून ज्या सूचना मिळतात, त्या मार्गदर्शन करत असतात, असे मत अॅड. भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले़ पं. दादासाहेब प्रतिष्ठानच्या वतीने मंदाश्री पुरस्काराचे वितरण करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ यावेळी नाशिकचे शरद माजगावकर आणि मुंबईच्या कृष्णमूर्ती अभ्यासक नीलम पोतदार यांना अॅड. आव्हाड यांच्या हस्ते मंदाश्री पुरस्कर प्रदान करण्यात आला़ यावेळी व्यासपीठावर डॉ़ वा़ ल़ मंजुळ, चंद्रकांत शेवाळे, प्रतिष्ठानचे विश्वस्त विजय जकातदार, नंदकिशोर जकातदार उपस्थित होते़ नीलम पोतदार यांनी ज्योतिषशास्त्राचा प्रचार, प्रसार आणि विद्या देणाऱ्या संस्थेकडून आपल्या माणसाने आपले कौतुक केलेले पाहून खूप आनंद झाल्याचे सांगितले़ प्रतिष्ठानचा उपक्रम आम्हाला प्रोत्साहन देणारा असून आलेल्या जातकाला प्राणवायू देऊन त्याचे दु:ख कमी करुन त्याचा आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा सल्ला शरद माजगावकर यांनी दिला़ ग्रहांकितचे संपादक चंद्रकांत शेवाळे यांनी श्रीकृष्ण जकातदारांकडे माणसे पारखण्याची क्षमता होती़ व त्यांनी शास्त्राला सोडून कधीही वर्तन केले नाही, असे सांगितले़डॉ़ वा़ ल़ मंजुळ म्हणाले, जकातदार कुटुंबीय ज्योतिष्याची परंपरा चालवत आहे़ ज्योतिषशास्त्रात बाबा वाक्यं प्रमाणाम ही संकल्पना बदलण्याची गरजेचे आहे़ सुरुवातीला विजय जकातदार यांनी मंदाश्री पुरस्कारामागची भूमिका विशद करुन मानपत्राचे वाचन केले़ नंदकिशोर जकातदार यांनी पाहुण्याचा परिचय करुन दिला़ सूत्रसंचालन व आभार पल्लवी चौहान यांनी मानले़
सध्या समाजात भविष्याचा धंदा केला जातो आणि त्यातून पैसे कमावले जातात़ लोकांना उभारी देण्यासाठी या शास्त्राचा विचार होणे आवश्यक आहे़ ज्योतिषांनी तत्त्वज्ञान समजून घेऊन कर्मकांडाचा विचार करावा़ धर्मात आचरण महत्त्वाचे आहे.
- अॅड. भास्करराव आव्हाड