भिर्रर...! अखेर अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार', पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 01:17 PM2022-02-16T13:17:58+5:302022-02-16T13:19:50+5:30
बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते
पुणे : बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना म्हणाले होते. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो,” असे अमोल कोल्हे यांनी सांगितले होते. आज अखेर अमोल कोल्हे यांनी दिलेल्या शब्दला सत्यात उतरवले आहे.
पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बैलगाडा शर्यतीला अतिशय उत्साही वातावरणात सुरुवात झाली. गावातील असंख्य नागरिकांनी शर्यत बघण्यासाठी गर्दी केली होती. या शर्यतीत अमोल कोल्हे यांनी तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोऱ्हं घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो असे सत्यात उतरवून दाखवले आहे.
भिर्रर...! अखेर अमोल कोल्हेंनी शब्द पाळला; बैलगाडा शर्यतीत घोडीवर 'स्वार'#pune@kolhe_amolpic.twitter.com/EHaZkGr0Pm
— Lokmat (@lokmat) February 16, 2022
पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते
लोकसभेच्या निवडणुक प्रचारादरम्यान, बैलगाडा शर्यत सुरू होताच, पहिल्या बारीत घोडीवर बसेन, असे आश्वासन कोल्हे यांनी दिले होते. कोल्हेंच्या या आश्वासनाची आठवण करुन देत आढाळरावांनी त्यांना निमगावच्या घाटात येण्याचे खुले आव्हान दिले. 'खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्या गावातील घाटात बैलगाडा शर्यतीत भाग घेऊन घोडीवर बसावं आणि निवडणुकीच्या प्रचारात दिलेला शब्द सत्यात उतरवावा, असे त्यांनी म्हटलं. दरम्यान आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या त्यांच्या गावातील घाटातून आढळरावांनी कोल्हेंना निमंत्रण धाडलं अखेर आढळराव पाटलांचे आव्हान कोल्हेंनी स्वीकारले आहे.