शिरूर (जि. पुणे) : १९९५ मध्ये काँग्रेस पक्षाने पोपटराव गावडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले बाबूराव पाचर्णे यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढविली. त्या काळी पाचर्णे हे माझे उमेदवार तर पोपटराव गावडे हे शरद पवार यांचे उमेदवार अशी चर्चा रंगली होती. मात्र, त्यात तथ्य नव्हते, त्या वेळेसदेखील शरद पवार व मी एकच होतो आणि आतादेखील एकच आहोत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दिवगंत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने तर्डोबाचीवाडी येथे पाचर्णे यांचे स्मारक उभे करण्यात आले आहे. अजित पवार यांनी या स्मारकाचे लोकार्पण करून अभिवादन केले. शिरूर तालुक्याच्या विकासासाठी पाचर्णे यांनी दिलेले योगदान मोठे असून, त्यांचे स्मारक सदैव प्रेरणा देत राहील, असेही पवार म्हणाले.
...त्यावेळी शरद पवार आणि मी एकच होतो; आताही एकत्र असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 11:07 AM