पुणे : आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांकडून अद्याप यादी न आल्याने आणि एका जातीवर निवडणूक लढणं शक्य नसल्याचं सांगत जरांगे यांनी आपल्या समर्थकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. "समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा," असं त्यांनी समाजबांधवांना सांगितलं आहे. निवडणूक लढवण्यासाठी खलबतं करणाऱ्या जरांगे पाटलांनी अचानक माघार का घेतली, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. अशातच लक्ष्मण हाकेंनी जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली आहे. बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून माघार घेतली असल्याचे त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
हाके म्हणाले, मी नेहमी सांगत आलो होतो, ते निवडणूक लढणार नाहीत,किंवा सामोरे जाणार नाहीत. बारामती स्क्रिप्ट नुसार ते वागत आहे. जत्रा भरवण सोप असत लढण अवघड असत. लोकसभेला बारामती सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला. आज ओबीसी एकवटला त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून माघार घेतली आहे. राणांना लढायला वाघाचं काळीज लागतं गनिमी काव्याचा काळ गेला. दिवसाला भूमिका बदलणार माणूस आहे.
मुंबई वेशीवरून माघारी आले. राजकारण, निवडणूक याचा अभ्यास नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी पाठींबा दिलाय. ते आता काम करणार नाही. ज्यांनी जरांगे पाठींबा दिला. त्याचा कार्यक्रम ओबीसी पाडणार. ज्यांनी पत्र दिले त्यांना भेटले त्याचा कार्यक्रम करणार आहेत.
शरद पवारांच्या उमेदवाराला पाठींबा
ओबीसीचा समाजाचा वापर करून निवडून आले. आमचे पण काही उमेदवार आहे. अनेक ठिकाणचे उमेदवार निवडून येणार आहे. आमचे ओबीसी उमेदवार आहेत. १० ते १२ मतदार संघात आमचे उमेदवार आहेत. काही मतदारसंघात अनेक अर्ज ओबीसीने अर्ज आहेत. मराठवाड्यातील ७-८ जिल्ह्यातील आम्ही काम करत आहोत. ओबीसी ७० जागा लढणार काही ३०-३५ ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार आहोत. शरद पवारांच्या उमेदवाराला पाठींबा असेल. पण त्यांना ओबीसी बाबत भूमिका घेणार असेल त्यांना पाठिंबा देणार, लेखी देणार असेल, आणि विरोधात असेल त्याचा विरोध असेल. अशोक चव्हाण यांच्या विरोधात सभा घेतली आहे, त्यांनी ओबीसी बाबत भूमिका घेतली आहे.
शरद पवारांनी जरांगे पाटलांना समजावून सांगावे
जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूला असेल त्यांना आमचा पाठींबा असेल. मी पळ काढणारा नाही. तीन वाजेपर्यंत वाट पहा. ओबीसी हक्क अधिकार यासाठी लढणार आहे. मी वंचित बहुजन आघाडीच्या काही उमेदवारांच्या प्रचाराला नक्कीच आहे. बाळासाहेब संविधानाचं संरक्षण करत आहेत. म्हणून त्यांच्या बोटावर मोजण्याची शक्यता लोकांचा प्रचार मी नक्की करीन. शरद पवारांकडे नेता म्हणून पाहिले जात आहे. शरदचंद्रजी पवार यांना ओबीसी हिताचे कुठलेही देणंघेणं नाही. शरद पवार यांनी जरांगे पाटील यांना समजावून सांगितले पाहिजे. ओबीसी बाजू घेणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आमचा पाठिंबा असेल