बालेवाडी : बालेवाडी येथील निकमार समोरील हॉटेल व्यावसायिकांवर मोठा गवगवा करून सुरू केलेली अतिक्रमण विरोधी कारवाई शुक्रवारी केवळ फार्स ठरली. या कारवाईमागे शिस्त लावण्यापेक्षा उपद्रवमूल्य वाढविण्याचाच उद्देश अतिक्रमण विभागाचा स्पष्ट दिसत होता. कारण ही कारवाई संपताच काही तासांतच या रस्त्यांवर पुन्हा जैसे थे स्थिती पाहावयास मिळाली.या रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र कारवाईनंतर काही तासांतच हॉटेल व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण करून व्यवसाय उभारल्याने परिसरात कारवाई करून उपयोग काय? असा आश्चर्यकारक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. मोठा गाजावाजा करत ही कारवाई केल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमण केल्यामुळे कारवाईचा फुसका बार ठरला ठरला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावरून मिटकॉन शेजारून बालेवाडीकडे जाणाºया या मार्गावर अनेक छोटीमोठी हॉटेल्स असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ दिसून येते.यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकासह पादचारी नागरिकांना सहन करण्याची वेळ येत होती. अनेक वेळा तर एखाद्या वाहनचालकांचा पादचारी नागरिक अथवा दुचाकीस्वारास धक्का लागला तर त्यांच्या दहशतीचा सामना वाहनचालकांना करण्याची वेळ येत असे.
अतिक्रमण कारवाईचा फुसका बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:38 AM