पुणे : एकदा अटलबिहारी बाजपेयी दाेन दिवसांच्या पुणे दाैऱ्यावर अाले हाेते. पुणे दाैऱ्यावरुन ते रेल्वेने मुंबईकडे जाणार हाेते. त्यावेळी मी सुद्धा त्यांच्याबराेबर हाेताे. त्यांना गाडीतून पुणे रेल्वेस्टेशनला साेडले. ते रेल्वेत बसणार तेवढ्यात त्यांना काहीतरी अाठवले अाणि ते दहा पाऊले मागे अाले. तेव्हा अाम्ही त्यांना विचारलं की काेणाला बाेलवायचंय का ? काेणाशी बाेलायचयं का....? तर ते नाही म्हणाले, अाणि दाेन दिवस त्यांच्यासाेबत जाे ड्रायव्हर हाेता, त्याला त्यांनी नमस्कार करत नमस्कार चक्रधर असे ते म्हणाले. एवढा माेठा माणूस दाेन दिवसाच्या सहवासात असलेल्या ड्रायव्हरचा सन्मान करताे यातच त्यांचं किती माेठं मन हाेतं याचा प्रत्यय येताे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट अटलबिहारीजींची अाठवण सांगत हाेते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं अाज (16 अाॅगस्ट) दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारतातून दुःख व्यक्त करण्यात येत अाहे. पुण्यात वाजपेयी जेव्हा यायचे तेव्हा त्यांच्यासाेबत बापट असयाचे. त्यांनी वाजपेयींच्या पुण्यातील अनेक अाठवणींना उजाळा दिला. बापट म्हणाले, पुण्यात अटलजी अालेत अाणि अाम्ही त्यांच्यासाेबत नाही, असे झालेच नाही. मंगेशकर हाॅस्पिटलचे उद्घाटन, बाबासाहेब पुरंदरेंचा पुण्यभूषण सत्कार, रमणबागेत झालेला गीतरामायणाचा कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांना ते पुण्यात अाले हाेते. पक्षाचा पाया मजबुत करण्यात अाणि देश पातळीवर पक्ष उंचीवर नेण्यात अटजींचं खूप माेठं याेगदान अाहे. अटलजींची कारकिर्द खूप गाजली. संघटनेच्या वाढीसाठी देशभर अटलजी खूप फिरले. जनसंघात अनेक पदे त्यांनी भूषवली. संघटनेच्या बळकटीसाठी एसटी, माेटरसायकलवरुनही ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरले अाहेत. प्रगल्भ विचार, व्यापक भूमिका, सर्वांना एकत्र घेऊन काम अाणि अनेक पक्षांना साेबत घेऊन सरकार चालविण्यात अटलजी यशस्वी झाले. देश-विदेशात त्यांनी पक्षाचे नाव पाेहचवले. ते उत्तम कवी, वक्ते हाेते. त्यांच्या इतका प्रवास काेणी केला नसेल. त्यांची वैचारिक बैठक पक्की हाेती. एकमताने पराभव झाल्यानंतर राजीनामा देताना त्यांचं लाेकसभेतलं भाषण हा एक एेतिहासिक ठेवा अाहे. राजकारणातले अनेक चढउतार त्यांनी पाहिले पण ते अविचल असायचे.