इंदापूर : एटीएममधून पैसे काढून जेवणाची उधारी देण्याची सबब सांगून हॉटेलमधील आचाऱ्याला, दूर नेऊन, काठी व लोखंडी पाइपने बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सुधीर लोंढे, अमजद शेख (दोघे रा. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. विनोद माने यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. विनोद माने ६ महिन्यांपासून हॉटेल मदिना येथे आचारी म्हणून काम करीत आहेत. गुरुवारी (दि. २३) रात्री काम संपवून जेवणानंतर हॉटेलमध्ये बसले असता, दुचाकीवरून आरोपी तेथे आले. हॉटेलच्या उधारीचे पैसे एटीएममधून काढून देतो, असे सांगून त्यांनी फिर्यादीस दुचाकीवर बसवून, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एस. बी. पाटील महाविद्यालयाच्या पुढे असणाऱ्या हॉटेलजवळ आणले. दुचाकीवरून उतरवताना फिर्यादीचा मोबाईल पाडला. आपला मोबाईल द्या, असे फिर्यादी म्हटल्यावरून रस्त्याच्या कडेला पडलेल्या काठी व लोखंडी पाइपने आरोपींनी त्यास बेदम मारहाण केली.
आचाऱ्याला बेदम मारहाण
By admin | Published: June 26, 2016 4:35 AM