आतिषने पहिल्या फेरीत हरियाणाच्या शुभमला अतिशय चुरशिच्या लढतीत १३ - १२ अश्या फरकाने पराभूत केले. दुसऱ्या लढतीत पंजाबच्या हरदिप सिंध १० गुणांच्या फरकाने एकतर्फी पराभूत केले. तिसऱ्या फेरीत कर्नाटकच्या सूरजला १८ -०८ गुणांनी पराभूत करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. उंपात्य फेरीत हरीयाणाच्या अमनकडून गुणांवर पराभव स्विकारावा लागला. परंतु कांस्यपदकाच्या लढतीत उत्तरप्रदेशच्या विशालला १३ - ५ गुणांनी पराभूत करुन कांस्यपदक मिळवले.
आतिष जोग महाराज व्यायाम शाळा आळंदी येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्द्ल त्याचे कुस्तीगीर परीषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहीते, उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, आमदार सुरेश धस आदींनी अभिनंदन केले.