याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेली माहिती अशी की, चाकण औद्योगिक वसाहतीतील भांबोली गावच्या हद्दीतील पिंजण यांच्या बिल्डिंगमध्ये एटीएम मशीन आहे. औद्योगिक वसाहतीमधील रहदारीच्या ठिकाणी हे एटीएम मशीन असल्याने नेहमीच पैसे काढण्यासाठी लोकांची वर्दळ असते, त्यामुळे या एटीम मशिममध्ये सतत लाखो रुपयांची रक्कम भरलेली असते.
मंगळवारी ( दि.२१ ) रात्रौ दीड ते दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीन बॉम्ब सदृष्य स्फोटाने उडवून दिले. त्याचा सिलेंडर फुटल्यासारखा मोठा आवाज झाला. त्यामुळे बिल्डिंगमधील मालक पिंजण घराबाहेर आले. त्यावेळी समोर उभे असलेल्या चोरट्याने, उसको गोली मारो अस म्हणल्यावर पिंजण त्याच्या घरात गेले. त्यानंतर चोरट्यानी एटीएम मधील रक्कम घेऊन पोबारा केला.
एटीममध्ये केलेला स्फोट इतका मोठा होता की, त्यामुळे एटीएम मशीनचा समोरील भाग उडून गेला आहे , तसेच एटीएम मशीनच्या समोरचा पत्रा दूर उडून पडला आणि दारांच्या काचांचा चक्काचूर झाला आहे. मशिनमधील काही रक्कम बाहेर फेकली गेली होती तर मशीनच्या फुटलेल्या भागात १० ते ११ लाख रुपये सुरक्षित राहिले तर २८ लाख रुपये चोरीला गेली आहे.
दरम्यान काळात अधिक तपास करण्यासाठी श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.
-------------------------------------------------------
फोटो क्रमांक : २१ चाकण एटीएम मशीन फुटली
फोटो - एटीएम मशीनचा स्फोट घडवून आणल्याने झालेली अवस्था.