शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

चाकणमध्ये एटीएम मशीन फोडून मारला ४० लाखांवर डल्ला; सीसीटीव्हीचीही तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 6:47 PM

तळेगाव चाकण महामार्गालगतच्या वाळके कॉम्प्लेक्समधील एका बँकेच्या दोन एटीएम मशीन फोडून तब्बल ३९ लाख ५९ हजार ४०० रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला.

ठळक मुद्देदोन एटीएम मशीन फोडून ३९ लाख ५९ हजार ४०० रुपयांवर चोरट्यांनी मारला डल्लाअज्ञात चोरट्यांविरोधात गु. र. नं. १०९५/२०१७ नुसार भा. दं. वि.कलम ३८०, ४२७ नुसार गुन्हा दाखल

चाकण : चाकणच्या औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे (ता. खेड) येथील तळेगाव चाकण महामार्गालगतच्या वाळके कॉम्प्लेक्समधील एका बँकेच्या दोन एटीएम मशीन फोडून तब्बल ३९ लाख ५९ हजार ४०० रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना आज (दि. ३) सकाळी उघडकीस आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व ठाणे अंमलदार मुश्ताक शेख यांनी दिली.मनोहर नागेश देसाई (रा. पिंपळे निलख, पिंपरी) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळील महाळुंगे औद्योगिक वसाहतीतील वर्दळीच्या रस्त्यावरीलल पालखी चौक, वाळके कॉम्प्लेक्समधील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम चाकण तळेगाव या महामार्गालगत आहेत. औद्योगिक वसाहत असल्याने या ठिकाणी नेहमीच पैसे काढण्यासाठी लोकांची वर्दळ असते, त्यामुळे या एटीएम मशिममध्ये दिवसाआड लाखो रुपयांची रक्कम भरली जाते, त्यानुसार मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान येथील एटीएम मशीनमध्ये मोठी रक्कम भरण्यात अली होती. काल बुधवार (दि. १) रात्री बारा ते पहाटे पाचच्या दरम्यान एटीएम मशीन बाहेरील अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेसाठी असलेला सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणेचे तोडफोड करून, एक चोरटा तोंडाला मफलर गुंडाळून आतमध्ये घुसला. आतमधील सीसीटीव्ही कॅमेरेही तोडून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले. त्यातील रोख रक्कम ठवण्याचे ट्रे घेऊन रस्त्याच्या पलीकडे असणार्‍या बंद घराच्या ओट्यावर ट्रे मधील रोख रक्कम काढून मोकळे ट्रे तेथेच टाकून पसार झाले. ही घटना सकाळी बँकेचे कर्मचारी आल्यावर एटीएम मशीन फोडून, त्यातील रोख रक्कम चोरी झाल्याचे दिसून आले.चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच तपासाच्या दृष्टीने पावले उचलत पुणे येथील स्वान पथक पाचारण केले. दरम्यान आज सकाळी पुणे नाशिक महामार्गावरील स्वप्ननगरी येथे एक बेवारस  सुमो गाडी आढळून आली. या गाडी गॅस कटर व गॅस सिलेंडर, रुमाल आढळून आले. पथकाने आपल्या जवळील श्वानास सुमो गाडीतील वस्तूंचा  वास देण्यात आला, मात्र स्वान जागेवरच खोळंबले. त्यामुळे पोलिसांनी मार्गावरील दोन्ही टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपास कामासाठी पोलीस कर्मचारी रवाना केले आहेत. चाकण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गु. र. नं. १०९५/२०१७ नुसार भा. दं. वि.कलम ३८०,४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप व सहकारी करीत आहेत.

 

एटीएम मशीनची सुरक्षा रामभरोसेचाकण व परिसरात विविध बँकेचे दोनशेच्या आसपास एटीएम मशिन आहेत. बहुतांश एटीएम मशीन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत. फक्त सीसीटीव्हीच्या भरवशावर सुरक्षा आहे. चाकणसह औद्योगिक वसाहतीत पोलिसांकडून रात्रीची गस्त घालण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांसह विविध कंपन्याच्या कर्मचार्‍यांनी केली आहे.

टॅग्स :atmएटीएमThiefचोरCrimeगुन्हा