याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : नीरेतील एक अल्पवयीन व दिव्यांग मुलगी बाहेर खेळत असताना तिला पैशाचे व वडापावचे आमिष दाखवून आरोपीने एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर नेले आणि मुलीशी अश्लील चाळे केले. या इमारतीच्या मालकाने हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर, मुलीच्या आईला सांगितले. आईने याबाबत मुलीला विचारले असता आरोपी अशिफ हसन पठाण, रा. नीरा प्रभाग-२ हा पैसे, वडापाव देऊन हा सगळा प्रकार करीत होता, अशी माहिती दिली. हे कुटुंब गरीब असल्याने तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी धीर देऊन तक्रार देण्यास सांगितल्याने त्यानंतर तक्रार देण्यात आली. त्यानुसार आशिफ पठाणवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीला अपंग संरक्षण कायद्यानुसार तातडीने शिक्षा देण्याची मागणी प्रहार अपंग संघटनेच्या प्रदेश महिलाध्यक्ष सुरेखा ढवळे, मंगेश ढमाळ, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे, अनिल मेमाणे, सुरेखा धुमाळ यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये रविवारी दिले आहे. संघटनेच्या वतीने आरोपीवर तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
--
फोटो क्रमांक : २४ नीरा दिव्यांग लैंगिक अत्याचार
फोटोओळ : आरोपीला अपंग संरक्षण कायद्याप्रमाणे शिक्षा करण्याच्या मागणीचे निवेदन देताना प्रहार अपंग संघटनेचे पदाधिकारी.