शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

माझ्यावरील अ‍ॅट्रोसिटी खोटी : श्रीपाल सबनीस; म. सु. पगारे यांच्यावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 6:14 PM

ही अ‍ॅट्रोसिटी खोटी असल्याचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी स्पष्ट केले आहे. रागाच्या भरात उचललेले हे पाऊल असल्याचे ते म्हणाले. 

ठळक मुद्देपगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी दाखल करण्यात आला अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोकरीला धोका निर्माण झाल्यामुळे त्याने दाखल केली खोटी केस : श्रीपाल सबनीस

पुणे : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी प्राध्यापकाच्या प्रमोशनासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर राज्यपाल, मुख्यमंत्री, डीवायएसपी, शिक्षण संचालक यांना मी निवेदन पाठविले. त्यावर चौकशी झाली. विद्यापीठाची फसवणूक केल्यामुळे त्याचा प्राध्यापकीचा पगार रद्द झाला. त्याचाच राग मनात धरून त्याने अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ही अ‍ॅट्रोसिटी खोटी असल्याचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी स्पष्ट केले. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्यासह विद्यापीठाचे कुलसचिव बी. बी. पाटील, उच्चशिक्षण सहसंचालक केशव तुपे, पुणे येथील उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने या चार जणांविरूद्ध पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी विचारले असता ही अ‍ॅट्रोसिटी खोटी असून, रागाच्या भरात उचललेले हे पाऊल असल्याचे ते म्हणाले. न्यायालयासह जळगाव आणि धुळे पोलीस ठाण्यात पगारे यांच्या पुढाकारातून कार्यकर्त्यांनी मला अटक करावी, अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांनी सबनीस निर्दोष असल्याचा अहवाल दिला होता. दहा वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे. माझ्यावर अ‍ॅट्रोसिटी दाखल करण्याची त्याची पहिलीच वेळ नाही. आत्तापर्यंत तीनवेळा पगारे यांनी अ‍ॅट्रोसिटी दाखल केली आहे. पण मी निर्दोष सुटलो आहे. आता हे नवीन प्रकरण समोर आले आहे. २०११मध्ये त्यांनी प्राध्यापकाच्या प्रमोशनासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. ही गोष्ट उघडकीस आणल्याचा राग मनात धरला. त्याच्या नोकरीला धोका निर्माण झाल्यामुळे त्याने ही खोटी केस दाखल केली आहे. तरीही संपूर्ण दलित समाज माझ्या पाठीशी असल्याचा विश्वास सबनीस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसNorth Maharashtra Universityउत्तर महाराष्ट्र विद्यापीठPuneपुणे