ठळक मुद्दे इंदिरानगर येथील त्रिमूर्ती परिसरात घडली घटना, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलफिर्यादीला दरमहा एक हजार रुपये हप्त्याची केली मागणी
पुणे : दुकानदाराने हप्ता देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री इंदिरानगर येथील त्रिमूर्ती परिसरात घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जगदीश मवानी (वय ३६, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादींचे अपर इंदिरानगर येथे किराणा मालाचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी ते पत्नीसह दुकानात बसले होते. या वेळी त्यांच्या परिचयाच्या एका व्यक्तीसह तिघे त्यांच्या दुकानात आले. त्यांनी फिर्यादीला दरमहा एक हजार रुपये हप्त्याची मागणी केली. मात्र यास फिर्यादीने विरोध केला. यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली.